हिवाळे स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्फर्धेत भारदेची अम्रता लव्हाट प्रथम

शेवगाव प्रतिनिधी, दि.१६ : अहमदनगर महाविद्यालय प्रायोजित रूथबाई हिवाळे स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत येथील पद्मभूषण बाळासाहेब भारदे विद्यालयातील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कु. अमृता बंडू लव्हाट हिने प्रथम क्रमांक पटकावला. माध्यमिक गटात सहभागी ८५ विद्यार्थ्यांमधून ‘स्मार्टफोन शाप की वरदान’ या विषयावर प्रभावी भाषण करून तीने हे यश पटकावले. तिला रोख रक्कम ३००० रुपये व स्मृतिचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

या स्पर्धेत विद्यालयाची विद्यार्थिनी समृद्धी प्रदीप काळे हिने ही उल्लेखनीय सहभाग नोंदवला. या विद्यार्थिनींना विद्यालयातील शिक्षिका मीनाक्षी कदम यांचे मार्गदर्शन लाभले.

हे उज्वल यश संपादन केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष रमेश भारदे, शाळा समिती अध्यक्ष हरीश भारदे, प्राचार्य शिवदास सरोदे यांच्या हस्ते त्यांना  सन्मानित करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य संजय कुलकर्णी, पर्यवेक्षक गोकुळ घनवट, उमेश घेवरीकर, सदाशिव काटेकर शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर सेवकवृंद उपस्थित होते.