कोपरगाव प्रतिनिधी, दि.१९ : राञीच्या वेळी दुसऱ्या कोणा बरोबर तरी मोबाईल वरून बोलत असल्याचा राग चुलत्याला आला आणि काही क्षणाचा विलंब न करता चुलत्याने कु-हारीचे घाव वर्मी घालुन पुतणीची हत्या केल्याची घटना कोपरगाव शहरातील खडकी परिसरात घडली.
या घटनेची पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शहरातील खडकी भागात बुधवारी रात्री साडे अकाराच्या सुमारास घडली. नेहा कांबळे ही विवाहीत युवती कोणासोबत तरी मोबाईल वरती बोलत असल्याचे चुलते संतोष हरिभाऊ आरणे याला समजताच त्याचा राग अनावर आला आणि थेट कु-हाडीने नेहा कांबळे हिच्या पायावर वर्मी घाव घालुन खुन केला. मयत नेहा संदीप कांबळे (वय-२१) वर्षे असे मयत युवतीचे नाव आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपी संतोष हरिभाऊ आरणे (२६) याला अटक केली आहे.
या घटनेची सविस्तर माहिती अशी की, खडकी परिसरात ज्योती नंदकिशोर आरणे यांच्याकडे त्यांची लग्न झालेली मुलगी नेहा हि बाथरूमसाठी घराबाहेर आली. घराबाहेर ती एका मुलासोबत बोलत असताना गुन्ह्यातील आरोपीने दुसऱ्या मुलासोबत बोलत असल्याच्या कारणावरून संशय घेत तिला बाहेर पडवीत बोलावून घेतले. त्यांच्या दोघामध्ये वाद झाला. तू इतर मुलाशी का बोलते अशी विचारण करून संशय घेतला.
आरोपीने हातातील कुऱ्हाडीने मयत नेहाच्या दोन्ही पायावर घाव घालुन खुन करून पळून गेला. मयत नेहाच्या जखमेतून रक्तस्राव झाल्याने रुग्णालयात दाखल करण्याआधीच ती मयत झाली. पोलिसांनी आरोपींचा तपास करत शहरातील नगर-मनमाड रस्त्यावर आरोपीला अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख करीत आहे.