एस. जी. विदयालयात पोलीस स्मृतिदिना निमित्त चित्रकला स्पर्धा

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ : भारतातील विविध पोलीस दलांमध्ये कर्तव्य बजावत असताना देशासाठी हौतात्म पत्करलेल्या सर्व पोलीस बांधव प्राणची आहुती देत शहीद होतात. त्यांना श्रध्दांजली देण्यासाठी व पोलीसा प्रती आदर म्हणुन २१ आक्टोंबर हा दिवस ‘पोलिस स्मृति दिन’ म्हणुन साजरा केला जातो.

या दिनाच्या निमित्ताने विदयालयांत चित्रकला स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने मार्गदर्शन करताना कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक मा. प्रदीप देशमुख यांनी पोलीसांची समाजा प्रति भुमिका समजावुन सांगितली. कर्तव्ये बजावताना काही पोलीस शहीद होतात त्यांच्या प्रति आठवण म्हणून हा दिवस महत्वाचा आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

शहीद पोलीसांचा सन्मान करणे हे देखिल आपले कर्तव्य आहे असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी केले. तर आभार उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड यांनी मानले. चित्रकला स्पर्धेचे संयोजन अनिल अमृतकर व अतुल कोताडे यांनी केले. विदयालयांच्या पर्यवेक्षक उमा रायते, मा. खारतोडे सर्व शिक्षक व विदयार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते.