विवेक कोल्हे यांनी केले कोपरगावच्या समस्यांरुपी महिषासुराचे दहन 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : दरवर्षीप्रमाणे यंदाही संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, युवा नेते विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून दसरा व विजयादशमी सणानिमित्त मंगळवारी (२४ ऑक्टोबर) रात्री कोपरगाव येथे महिषासुर दहन सोहळा पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी समाजातील अनिष्ट चालीरिती, वाईट विचार तसेच लोकप्रतिनिधींची अनास्था व प्रशासनाच्या ढिसाळ व गलथान कारभारामुळे कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेला भेडसावणाऱ्या पाणी, रस्ते, पूल, आरोग्य आदी समस्यांच्या महिषासुराचे प्रतीकात्मक दहन युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.

संजीवनी महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका कोल्हे, अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. येथील तहसील कार्यालयाशेजारील मैदानावर फटाक्यांच्या आकर्षक आतषबाजीसह रंगलेला हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी दुर्गामाता की जय, प्रभू श्रीरामचंद्र की जय, सीतामैय्या की जय, पवनपुत्र हनुमान की जय आदी घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते.

यावेळी युवा नेते विवेक कोल्हे यांनी बजरंगबलीची गदा हातात उंचावून कोपरगाव मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प सोडत विरोधकांना सूचक इशारा दिला. त्यावेळी उपस्थितांनी ‘विवेक कोल्हे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देत मोठा जल्लोष केला. या सोहळ्यात आकर्षक वेशभूषेत सहभागी झालेल्या कावेरी आढाव (महिषासुरमर्दिनी दुर्गा माता), अंकुश बाळासाहेब संत (प्रभू श्रीराम), श्वेता लोणारी (सीतामाता), लहू बाळासाहेब संत (लक्ष्मण), सतीश डुकरे (वीर हनुमान) या कलाकारांचे पूजन विवेक कोल्हे व पराग संधान यांच्या हस्ते करण्यात आले. या कलाकारांसोबत फोटो व सेल्फी काढण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. संजीवनी युवा प्रतिष्ठानने सलग दुसऱ्या वर्षी आयोजित केलेला हा महिषासुर दहन सोहळा संस्मरणीय ठरला.

विवेक कोल्हे यांनी दसरा व विजयादशमी सणानिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा देऊन कोपरगाव मतदारसंघासह संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त होण्यासाठी श्री दुर्गामातेच्या चरणी प्रार्थना केली. कोपरगाव मतदारसंघात जनतेला अनेक समस्या भेडसावत असून, चासनळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर व रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एका महिलेला नाहक आपला जीव गमवावा लागला ही शोकांतिका असल्याचे सांगून ते म्हणाले, असत्यावर सत्याचा, वाईटावर चांगल्याचा, अन्यायावर न्यायाचा, पापावर पुण्याचा विजय म्हणून दसरा व विजयादशमी हा सण देशभर सर्वत्र साजरा केला जातो.

नवरात्रोत्सवात गेली नऊ दिवस आपण सर्वांनी आदिशक्तीचा जागर केला. केवळ नवरात्रातच नव्हे तर सर्वांनी वर्षभर सदैव स्त्रीशक्तीचा आदर, सन्मान केला पाहिजे. संजीवनी युवा प्रतिष्ठान गेल्या आठ वर्षांपासून ‘जागवूया ज्योत माणुसकीची’ या ब्रीद्वाक्यानुसार युवा सशक्तीकरण, सामाजिक एकता, पर्यावरण संवर्धन, कृषी, आरोग्य हे पाच उद्दिष्ट घेऊन नि:स्वार्थीपणे पक्षविरहित सामाजिक कार्य करत आहे. अतिवृष्टी, महापूर, कोरोना महामारी व अन्य आपत्तीच्या काळात संजीवनी युवा प्रतिष्ठानने सामाजिक दायित्व स्वीकारून जनतेला मोठी मदत केली असून, मतदारसंघातील जनतेच्या सुदृढ आरोग्यासाठी मोफत फिरता दवाखाना सुरू केला आहे.

दरवर्षी प्रतिष्ठानतर्फे रक्तदान, आरोग्य शिबिरे, विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप, सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा, एक राखी जवानांसाठी, वृक्षारोपण, २४ तास ॲम्ब्युलन्स सुविधा, जलसंधारण, ग्रामस्वच्छता, पर्यावरण संतुलन, युवकांसाठी करिअर मार्गदर्शन, महापुरुषांची जयंती, शिवराज्याभिषेक सोहळा, दहीहंडी, गोकुळाष्टमी, ढोल-ताशा वादन स्पर्धा, गंगा गोदावरी महाआरती आदी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. भारतीय संस्कृती, सण, उत्सव, पारंपरिक खेळाचे जतन करण्याचे काम संजीवनी युवा प्रतिष्ठान करत असून, या कामात समाजाने साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

भव्यदिव्य ३० फुटांचा महिषासुराचा पुतळा व वीर हनुमान हे या सोहळ्याचे खास आकर्षण ठरले. संजीवनी युवा प्रतिष्ठानने कार्यक्रमस्थळी लावलेल्या जनतेला भेडसावणाऱ्या विविध समस्यांच्या माहिती फलकांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. महिषासुराचा पुतळा तयार करणारे राहुल कुऱ्हे यांचा विवेक कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सिद्धार्थ साठे तर सूत्रसंचालन मयूर चोळके यांनी केले.

याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष डी. आर. काले, माजी सभापती सुनील देवकर, न. प. तील भाजपचे माजी गटनेते रवींद्र पाठक, विनोद राक्षे, विजय आढाव, माजी नगरसेवक बबलूशेठ वाणी, संदीप देवकर, संजय जगदाळे, अशोकराव लकारे, गोपीनाथ गायकवाड, सोमनाथ म्हस्के, दिनेश कांबळे, रवींद्र रोहमारे, दीपक जपे, जयप्रकाश आव्हाड, सतीश रानोडे, विजय चव्हाणके, जयेश बडवे, पिंकी चोपडा, जगदीश मोरे, सचिन सावंत, खालिकभाई कुरेशी, फकिर मोहम्मद पैलवान, इलियासभाई खाटिक, नसीरभाई पठाण,

शफिकभाई सय्यद, शंकर बिऱ्हाडे, चंद्रकांत वाघमारे, वासिम पठाण, समीर खाटिक, सिद्धांत सोनवणे, सलीम पठाण, शाहरूख शेख, अनिल गायकवाड, रोहन दरपेल, रुपेश सिनगर, वासिम पटेल, लियाकत सय्यद, खंडू वाघ, संतोष साबळे, रामदास गायकवाड, रोहित कनगरे, सतीश निकम, वासुदेव शिंदे, स्वप्नील मंजुळ, आकाश वाजे, पंकज कुऱ्हे, स्वराज लकारे, विक्रांत सोनवणे, अर्जुन मरसाळे, शुभम पेकले, अर्जुन मोरे, संदीप ठोमसे, रवींद्र कळसकर, किरण गायकवाड, नवनाथ संवत्सरकर, शेखर कुऱ्हे,

नितीन कुऱ्हे, सागर राऊत, दुर्गेश गवळी, आदित्य डिंबर, नयन शिंदे, चंदू जाधव, गणेश कळसे, युवराज शिरसाठ, समीर सुपेकर, आकाश खैरे, सौरभ होन, विक्की परदेशी, मंगेश धनगे, अजय शार्दूल, पीयुष चिने, समर्थ घुमरे, समाधान कुऱ्हे, शिवप्रसाद साठे, तेजल भोई, सौरभ मुसळे, अभी सूर्यवंशी, राहुल माळी, कुणाल आमले, गौरव येवले, यश दवंगे आदींसह भाजप, शिवसेना व विविध संस्थांचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते, संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक, व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.