के. जे. सोमैया महाविद्यालयात अंतरराष्ट्रीय सूक्ष्मजीवशास्त्र दिन साजरा 

कोपरगांव प्रतिनिधी, दि.२५ : के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या वतीने अंतरराष्ट्रीय सूक्ष्मजीवशास्त्र दिनाचे औचित्य साधुन ‘मायक्रो बी आर्ट कॉम्पिटिशन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नाशिक येथील के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या प्रा.अमृता जाधव व आर.जे.एस. फार्मसी महाविद्यालयाचे प्रो.एस.पी.लावरे हे उपस्थित होते. या दोन्ही तज्ञांनी विद्यार्थ्यांना ‘रिसेंट ट्रेड्स इन मायक्रोबायोलॉजी’ आणि ‘स्कोप ऑफ मायक्रोबायोलॉजिस्ट इन फॉर्मॅस्टिकल इंडस्ट्री’ या विषयावर मार्गदर्शन केले.

यावेळी सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पोस्टर प्रस्तुतिकरण व इतर स्पर्धेत नालंदा काकले, साक्षी पिंगळे, सार्थक मडके, वर्षा पऱ्हे, साक्षी बोर्डे, तृप्ती भालेराव, साक्षी गायकवाड, गायत्री चव्हाण यांनी क्रमांक पटकावले. यश प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस.यादव यांनी आपल्या स्वागत मनोगतात सूक्ष्मजीवशास्त्र विभागाद्वारे विद्यार्थ्यासाठी आयोजित करण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.

विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात आत्मसात केलेली कला ही त्यांना विकासाकडे घेऊन जाते असेही सांगितले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे विश्वस्त मा. संदिपराव रोहमारे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विभागप्रमुख प्रा.पूजा गख्खड यांनी कार्यक्रमाचे स्वरूप व पाहुण्यांचा परिचय करून दिला.

सूत्रसंचालन प्रा.पी.एस.कातोरे यांनी तर आभार प्रा. मिलिता वंजारे यांनी मानले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रा.आरती गाडेकर, प्रा. निकिता फटांगरे, प्रा. तनुजा जम्बुकर, अमोल दहे, आकाश जगताप यांनी विशेष परिश्रम घेतले. अंतरराष्ट्रीय सूक्ष्मजीवशास्त्र दिनाच्या कार्यक्रमासाठी विभागातील प्राध्यापकांसह बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.