मतदानासाठी मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद
कोपरगाव प्रतिनिधी दि. ५ : तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. ७८ टक्के मतदारांनी मतदान केले असल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी दिली. पोलिसांचा मोठा चोख बंदोबस्त असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.
तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीमध्ये १७७ सदस्य पदापैकी तीन सदस्य बिनविरोध निवडून गेले होते. उर्वरित १७४ सदस्यांच्या जागेसाठी ४०० उमेदवार तर जनतेतून थेट सरपंच निवडीसाठी १७ जागांसाठी ४८ उमेदवार आपले नशीब अजमावीत आहे. सर्व ग्रामपंचायत मिळून २२८१७ पुरुष तर २३८६५ स्री असे एकूण ४६६८२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार होते.
मात्र सकाळपासून मतदान केंद्रावर मतदारांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. काही मतदान केंद्रावर उमेदवारांनी उपस्थिती दर्शवली तर काही शेवट पर्यंत मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेत असल्याचे दिसून आले. तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठीची सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी योग्य नियोजन केले होते.
८० केद्रावर तब्बल ४०० अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. शासकीय यंत्रणा सज्ज असल्याने अखेर निर्विघ्नपणे मतदानाची प्रक्रिया पार पडली. उद्या दि. ६ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयात मतमोजणी करण्यात येणार असून सकाळी दहा वाजता मतमोजणीस सुरुवात होईल. सात फेऱ्यामध्ये मोजणी पार पाडली जाणार असल्याची माहिती तहसीलदार भोसले यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
मतदान झालेल्या ग्रामपंचायतीची टक्केवारी पुढील प्रमाणे – १) बोलकी – ७९.२९ टक्के २) पोहेगाव – ८५.१२ टक्के ३) मंजूर – ७९.५९ टक्के ४) चांदगव्हाण -९४ टक्के ५) कान्हेगाव – ७८.८० टक्के ६) कुंभारी ८८.४१ टक्के७) ब्राम्हणगाव – ७६.९४ टक्के८) वारी – ७६.०६ टक्के ९)जवळके – ९१.१३ टक्के टक्के१०)धोञे – ८९.९८ टक्के ११)लौकी ९०.६३ टक्के १२)शहाजापूर – ७३.१९ टक्के १३) घोयेगाव. ९१.२१ टक्के १४)मुर्शतपूर – ७४.३९ टक्के १५)कारवाडी – ८७.१२ टक्के १६)सुरेगाव – ६६.६५ टक्के १७) बोलकी – ७४.९२