शेवगाव प्रतिनिधी, दि.१८ : शेवगाव तालुक्यात पार पडलेल्या २७ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकी नंतर उपसरपंचपदाच्या निवडीसाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये नव निर्वाचित सदस्यांच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या गुरुवारी (दि.२३) तालुक्यातील बालमटाकळी, शहरटाकळी, देवटाकळी, हिंगणगावने, मुंगी, कऱ्हेटाकळी, खरडगाव थाटे, ढोरसडे आंत्रे, बोधेगाव, वडुले खुर्द व वरुर बुद्रूक अशा १२ ग्रामपंचायती मध्ये तसेच शुक्रवारी (दि.२४) भगूर, लोळेगाव, सामनगाव,
भागवत एरंडगाव, लाखेफळ, वडुले बुद्रूक, खडके, मडके, लाड जळगाव, आव्हाणे बुदुक, बऱ्हाणपूर व दिवटे अशा १२ ग्रामपंयायातीत तर शनिवारी गोळेगाव, समसुद एरंडगाव व शेकटे खुर्द या तीन ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडणूका होणार आहे.
निवडणुक सभेच्या अध्यक्षस्थानी संबधित गावचे सरपंच राहाणार असून सदरची निवडणुक प्रक्रीया प्रशासकीदृष्ट्या सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निवडणूक निरीक्षक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.