कोल्हे कारखान्यात उत्पादीत पहिल्या इथेनॉलचा टँकरचे पुजन

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२१ : संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी देशात सर्वप्रथम सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांत थेट उसाच्या रसापासुन इथेनॉल निर्मीती सुरू केली. २०२३-२४ चालु गळीत हंगामातील उत्पादित पहिल्या इथेनॉल टँकरचे विधीवत पुजन उपाध्यक्ष मनेष गाडे व संचालकांच्या हस्ते मंगळवारी करण्यांत आले. 

प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव सुतार प्रास्तविक करतांना म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी विशाल दुरदृष्टीकोन ठेवत सहकारात सातत्याने नाविन्यपुर्ण प्रयोग करत भविष्यात निर्माण होणा-या संकटांना तोंड देण्यांसाठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यांस कायम सज्ज ठेवत बिपीन कोल्हे व अध्यक्ष विवेक कोल्हे, सर्व संचालक मंडळ त्यांच्या स्वप्नपुर्तीसाठी झटत आहे.

 सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांत थेट उसाच्या रसापासुन इथेनॉल निर्माती सुरू केली असुन २०२३-२४ चालु गळीत हंगामातील ज्युसपासुन उत्पादित पहिल्या इथेनॉल टँकरचे विधीवत पुजन उपाध्यक्ष मनेष गाडे व संचालकांच्या हस्ते पुजन करण्यात आले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व त्यांच्या सर्व सहकारी मंत्री मंडळाने इथेनॉल उत्पादनांस सर्वोच्च प्राधान्य देत त्यानुरूप ध्येय धोरणे घेतली. त्याचा सहकारी साखर कारखानदारीला मोठया प्रमाणात फायदा होत आहे. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी इंडियन ऑईल, हिंदुस्थान पेट्रोलियम व भारत पेट्रोलियम तेल कंपन्याबरोबर चालु गळीत हंगामात ९० लाख लिटर्स इथेनॉल पुरवठा करण्यांचे करार केले आहेत.

त्यातील पहिल्या टप्पात ६० लाख लिटर्स इथेनॉलचे उददिष्ट ठेवण्यांत आले असुन त्याच्या परिपुर्तीसाठी कारखाना व्यवस्थापन प्रयत्नशिल आहे.  याप्रसंगी संचालक बाळासाहेब वक्ते, बापूसाहेब बारहाते, रमेश घोडेराव, बाळासाहेब पानगव्हाणे, राज्य उत्पादन शुल्क उपाधिक्षक गणेश कसरे, व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे, आसवनी विभागप्रमुख राधाकृष्ण जंगले, वैभव वाघ, टी. व्ही. देवकर, सुरक्षा अधिकारी रमेश डांगे, खाते प्रमुख, उपखातेप्रमुख, कामगार उपस्थित होते.

कारखान्याच्यावतीने इथेनॉल वाहतुक करणा-या चालकांचा उपाध्यक्ष मनेष गाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला. विभाग प्रमुख राधाकृष्ण जंगले यांनी आभार मानले.