शेवगाव प्रतिनिधी, दि २७ : काल रविवारी रात्री अचानक सुरु झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील शेतकऱ्याचे नुकसान झाले.
मागील दोन दिवसांपासून आभाळ भरून येत होते. उकाडा ही जाणवत होता. रविवारी सायंकाळी आठच्या सुमारास ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि वार्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली व शेतकर्यांच्या संकटात भर टाकली. दोन- ठिकाणी विजा पडल्या. सुदैवाने जिवीत हानी झाली नाही.
या अवकाळी पावसाने शेतकर्यांच्या चिंतेत भर पडली. पपई, पेरू, डाळींब, केळीच्या फळबागांना फटका बसला. कापूस, तुर, उडीद या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणची पीके झोपली. या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी पुरते हतबल झाले. मात्र या पावसाने काही प्रमाणात पिकांना दिलासा मिळणार आहे.
या अवकाळी पावसामुळ ऊसतोड कामगारांचे मोठे हाल झाले. कोप्यात पाणीच पाणी झाल्याने त्यांच्या चुली पेटल्या नाहीत. ज्ञानेश्वरसाखर कारखान्याने आपल्या कामगाराची दोन वेळच्याजेवणाची सोय करून माणुसकी जागविली.