सरपंचा विरोधात तहसीलदारांकडे अविश्वास ठराव दाखल

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि. २७ : सरपंच मनमानी कारभार करतात, ग्रामपंचायतीचे कोणतेही कामकाजात विश्वासात घेत नाहीत म्हणून तालुक्यातील हसनापूर ग्रामपंचायतच्या सरपंचांच्या विरोधात नऊ पैकी सात ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंचाविरोधात तहसीलदारनकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला असून या अविश्वास ठरावावर निर्णय घेण्यासाठी मंगळवार दि.२८ नोव्हेंबर रोजी विशेष सभेचे आयोजन केले आहे.

Mypage

हसनापूर ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच शोभा ढाकणे या ग्रामपंचायत कामकाजामध्ये इतर सदस्यांना विश्वासात घेत नाहीत. तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी सुचविलेले विषय विचारात घेत नाही अशा कारणावरून हा अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. यावर तहसीलदार प्रशांत सांगडे यांचे अध्यक्षतेखाली मंगळवारी विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. उपसरपंच गणेश ढाकणे, अंकुश ढाकणे, काकासाहेब ढाकणे, पुष्पा ढाकणे, सुनिता ढाकणे, सविता खंडागळे, उषा ढाकणे, यांच्या प्रस्तावावर सह्या आहेत. 

Mypage