कोल्हे कुटुंबीय व संजीवनी उद्योग समूह शीख समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा – विवेक कोल्हे

श्रीगुरू ग्रंथचे दर्शन घेऊन शीख बांधवांना दिल्या शुभेच्छा

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२७ : सामाजिक एकता, सचोटी, मानवता व बंधुभाव जोपासणाऱ्या शीख समाजबांधवांचे कोपरगाव शहरातील बाजारपेठ फुलवण्यात मोलाचे योगदान आहे. माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांच्यापासून कोल्हे कुटुंबाचे शीख समाजबांधवांसोबत नेहमीच सलोख्याचे संबंध राहिले असून, शीख समाजबांधवांनी कोल्हे कुटुंबाला नेहमीच साथ दिली आहे.

कोल्हे कुटुंबीय व संजीवनी उद्योग समूह यापुढील काळातही शीख समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी दिली.

जगाला सामाजिक एकता, शांतता, बंधुभाव, मानवतावादाची शिकवण देणारे शीख धर्माचे संस्थापक व प्रथम गुरू श्री गुरू नानक यांची ५५४ वी जयंती सोमवारी (२७ नोव्हेंबर) कोपरगाव शहरातील गुरुद्वारामध्ये मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त अखंड पाठ, कीर्तन, प्रवचन असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले होते.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी गुरुद्वाराला भेट देऊन शीख धर्मियांच्या पवित्र ‘श्रीगुरू ग्रंथसाहिब’ धर्मग्रंथाचे मनोभावे दर्शन घेतले आणि शीख बांधवांना गुरू नानक जयंती व प्रकाश पर्वाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच लंगरमध्ये भाविक-भक्तांना महाप्रसाद वाटपाची सेवा करून महाप्रसादाचा लाभ घेतला.  

विवेक कोल्हे म्हणाले, शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक हे थोर तत्त्वज्ञ, समाजसुधारक व विचारवंत होते. दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला त्यांचा जन्म दिवस हा गुरू पर्व, प्रकाश पर्व व गुरू पूरब म्हणून साजरा करण्यात येतो. शीख धर्मात या दिवसाला खूप मोठे महत्त्व आहे. शीख समाजाचे देशाच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. गुरु नानक यांनी आपले संपूर्ण जीवन समाजाच्या कल्याणासाठी समर्पित केले. मानवतावादावर दृढ श्रद्धा असलेले, जात-धर्म यापलीकडे जाऊन एकतेची शिकवण आणि ‘कलि महि राम नाम सारु’चा उपदेश देणाऱ्या गुरू नानक यांनी परमेश्वर एक आहे आणि चराचरात त्याचे वास्तव्य आहे. आपला कर्ता, धर्ता व पिता सारे काही तोच आहे.

त्यामुळे आपण प्रत्येकाशी प्रेमपूर्वक भावनेने वागले पाहिजे, असा महत्त्वाचा संदेश दिला. परमोच्च ज्ञानाचे सार सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत मांडले. एक शांतीचा दूत, विश्वबंधुत्वाचा पुरस्कर्ता, मानवतेचा पूजक म्हणून गुरू नानक यांनी केलेले कार्य महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी केवळ सदाचार संपन्न असा नवा धर्मच स्थापन केला नाही, तर जातिव्यवस्था, अस्पृश्यता, सतीची चाल, मूर्तिपूजा, जाचक कर्मकांड, अनिष्ट रूढीविरुद्ध सतत लढा देऊन सामाजिक क्रांतीही घडवून आणली. जात-पात, उच्च-नीच भेद आणि अंधविश्वास संपवण्याच्या हेतूने त्यांनी सर्वांनी एकत्र बसून भोजन करण्याची ‘लंगर’ परंपरा सुरू केली. आज सर्वांनी गुरू नानक यांचे उदात्त विचार आचरणात आणण्याची गरज आहे.

यावेळी कोपरगाव गुरुद्वाराचे मुख्य ग्रंथी बाबा हरजीत सिंग, पप्पूसिंग पोथीवाल, सेवासिंग सहानी, मनिंदरसिंग भाटिया, सनी सिंग पोथीवाल, परमजितसिंग भाटिया, जॅकीसिंग दिगवा, दीपासिंग ठकराल, विनोदसिंग ठकराल, चंदूशेठ पापडेजा, बहादुरसिंग भाटिया, बादलसिंग पोथीवाल, कुकूशेठ सहानी, कलविंदरसिंग दडियाल, मनोज बत्रा, जोगिंदर भुसारी, अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, भाजपचे शहराध्यक्ष डी. आर. काले, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, भाजपचे माजी न. प. गटनेते रवींद्र पाठक, माजी नगरसेवक बबलू वाणी, अशोक लकारे, संदीप देवकर,

संजय जगदाळे, रवींद्र रोहमारे, भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, ‘अमृत संजीवनी’ चे संचालक गोपीनाथ गायकवाड, सोमनाथ म्हस्के, जयेश बडवे, सिन्नू भाटिया, विजय चव्हाणके, राजेंद्र गंगुले, खलिक कुरेशी, फकीर मोहम्मद पैलवान, शंकर बिऱ्हाडे, सतीश रानोडे, बाळासाहेब साळुंके, अण्णा खरोटे, सलीम पठाण, लियाकत सय्यद, राजेंद्र डागा, सिद्धार्थ साठे, रोहित कनगरे, विक्रांत सोनवणे, सुभाष परदेशी, संजय तूपसुंदर, धनंजय धनवटे, स्वराज सूर्यवंशी, वैभव सोळसे, सुजल चंदनशिव आदींसह शीख, पंजाबी  समाजबांधव व भाविक-भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.