रोटरी क्लबचा सायकल बँक अनोखा उपक्रम

शेवगाव प्रतिनिधी, दि.१३ :  रोटरी क्लब शेवगावच्या वतीने गरजू शालेय विद्यार्थिनींना जिजाऊ जयंती निमित्त सायकल बँक उपक्रमांतर्गत मोफत  सायकलींचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील वेगवेगळ्या शाळेमधील १४ गरजू विद्यार्थिनींची निवड करून त्यांना सायकली देण्यात आल्या.

त्यासाठी हरिभाऊ व कमल बोडखे यांच्या वतीने कै.डॉ. हंसराज बोडखे यांच्या स्मरणार्थ पाच तर प्रांजल फाउंडेशनच्या वतीने प्रशांत देवणे यांच्याकडून पाच सायकली, तसेच उज्वल धूत, मंगल गोरे, शुभांगी बढे, मनिषा दहातोंडे, यांनी प्रत्येकी एक सायकल देऊन योगदान दिले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य रमेश भारदे म्हणाले, रोटरी क्लबच्या समन्वयातून व समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने गरजू मुला-मुलींसाठी राबवलेला सायकल बँक हा उपक्रम स्तुत्य असून ग्रामीण भागातून शाळेला येण्यासाठी मदतीचे ठरणार आहे.

रो. हरीश भारदे, प्राचार्य शिवदास सरोदे, खजिनदार सुधाकर जावळे, रोटरीयन श्रीमती लबडे, डॉ.पुरुषोत्तम बिहाणी, डॉ.आशिष लाहोटी, डॉ मयूर लांडे, मोहम्मद वसीम, युसुफ पठाण, काकासाहेब लांडे, भागनाथ काटे, संतोष ढाकणे, बाळासाहेब चौधरी, वल्लभ लोहिया उपस्थित होते. रोटरीचे अध्यक्ष मनेश बाहेती यांनी प्रास्ताविक केले, सचिव प्रदीप बोरुडे यांनी आभार मानले.