शेवगाव प्रतिनिधी, दि.१५ : शहरात मोठमोठे स्टेडीयम, क्रीडा संकूल असतात. तेथे प्रत्येक खेळाच्या मार्गदर्शनासाठी उत्तम प्रकारचे कोचसह विविध सोयी सुविधा उपलब्ध असतात, ग्रामिण भागात या सोयी नसतात. म्हणूनच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नावाने ही ‘नमो चषक २०२४ ‘ या भव्य कीडा व सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन करून त्यांनी आपणांस मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचे प्रतिपादन आमदार मोनिकाताई राजळे यांनी केले.
येथील न्यू आर्टस कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयाच्या क्रिडा संकुलात ‘नमो चषक २०२४ ‘ या राज्यस्तरीय क्रीडा व संस्कृतिक महोत्सवा अंतर्गत कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन आज सोमवारी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रा. भानुदास बेरड, पै. महाराष्ट्र केसरी सईद चाऊस, अर्जून पुरस्कार विजेत्या पै. अंजली देवकर, मावळ केसरी विपुल आरडकर यांचे हस्ते मान्यवराचे उपस्थितीत करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी आ. राजळे म्हणाल्या, शेवगाव पाथर्डी सारख्या ग्रामीण भागात ‘नमो चषक २०२४ ‘ या राज्यस्तरीय भव्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवा अंतर्गत सर्वच्या सर्व सतरा क्रीडा प्रकारात राज्यभरातून तीस हजाराच्या वर ऑनलाईन नोंदणी करण्यात आली असून या स्पर्धा अत्यंत नियोजनबद्ध सुरू आहेत. याबद्दलचे श्रेय त्यांनी आपल्या समवेत काम करणाऱ्या युवा टीमला देऊन त्यांचे कौतुक केले.
यावेळी भाजपाचे माजी शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, शेवगाव तालुकाध्यक्ष ताराभाऊ लोढे, बापू पाटेकर, माणिकराव खेडकर, प्राचार्य डॉ. पुरुषोतम कुंदे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सचिन वारकड, सचिन वायकर, डॉ. नीरज लांडे पाटील, सुनिल ओहोळ, नितीन फुंदे, मृत्युंजय गर्जे, नंदकुमार शेळके, पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे, कचरू चोथे, केशव आंधळे, गंगा खेडकर, शुभम गाडे, सोमनाथ अकोलकर, विनोद शिंदे, नारायण पालवे, सागर फडके, गणेश कोरडे, नितीन दहिवाळकर, सुभाष बेरड, कासम शेख, सुरेश नेमाने, विक्रम बारवकर यांचेसह कोच, स्पर्धक व प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. बेरड म्हणाले, खेळाने आत्मविश्वास वाढतो. आ. राजळे राष्ट्रीय खेळाडू असल्याने त्यांचा आत्मविशवास जबरदस्त आहे. म्हणूनच त्या भाजपच्या १०६ आमदारात तिसऱ्या क्रमांकावर असून आगामी काळात त्यांना तिसर्यांदा आमदार करून हॅटट्रीक तर करायची, शिवाय त्यांना लाल दिव्याच्या गाडीत पहायचे आपल्या सर्वांचे अधुरे राहिलेले स्वप्नही प्रत्यक्षात आणायचे आहे.
यावेळी भैय्या गंधे, पै. सईद चाऊस, पै. अंजली देवकर, प्राभानुदास बेरड यांचीही भाषणे झाली. प्रारभी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आदर्श ग्राम वाघोलीचे प्रणेते उमेश भालसिंग यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर देशाचे पहिले ऑलम्पिक विजेते पै. खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करून हवेत फुगे सोडत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले, सुत्रसंचार रविंद्र सुरवसे यांनी सुत्र संचलन केले.