कोल्हे साखर कारखान्याचा सभासद शेतकऱ्यांसाठी हेल्पलाइन क्रमांक – विवेक कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१८ : सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांसाठी कारखान्याने ९३७१७१ २६२२  हा हेल्पलाइन नंबर तयार केला असून त्याचा सर्व सभासद, शेतकरी बांधवांनी वापर करावा असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले आहे.

ते म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया ऑनलाईन कामकाज संकल्पनेला मोठे प्राधान्य दिले असून त्याप्रमाणे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांनी हायटेक डिजिटल संकल्पनेचा अवलंब कोल्हे सहकारी साखर कारखान्यात करून माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी आधुनिकीकरणाला विशेष प्राधान्य दिले.

त्यानुरूप कारखान्याची वाटचाल सुरू ठेवत काळानुरूप बदल करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्याला सर्व संचालक, ज्ञात अज्ञात घटकांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे. दैनंदिन प्रशासकीय कामकाजात गतीमानता आणून त्याचा थेट सभासद शेतकऱ्यांना लाभ व्हावा हा प्रयत्न आहे. त्यासाठी सभासद शेतकऱ्यांना दैनंदिन कारखान्याच्या कामासाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९३७१७१ २६२२ तयार करण्यात आलेला आहे.

तरी सर्व सभासद शेतकरी बांधवांनी याचा जास्तीत जास्त वापर करावा व कारखान्याच्या कामकाजासंदर्भात संपर्क साधून विविध विभागाशी असलेल्या कार्यालयीन कामकाजात त्याचा उपयोग करावा. असे आवाहन उपाध्यक्ष मनेश गाडे, सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी केले आहे.