स्नेहलता कोल्हेंनी पदर खोचून केली मंदीराची साफसफाई

कोपरगाव प्रतिनिधी दि.२० :  साफसफाई करणे म्हणजे राजकीय नेतेमंडळींची फोटो गिरी अथवा दिखावूपणा असतो. कचरा कमी कार्यकर्ते ज्यास्त. हातात झाडू पण कचरा दिसत नाही पण फोटो अधिक झळकतात अशी सर्व ठिकाणी स्थिती आहे. पण याला माजी आमदार स्नेहलता कोल्हे अपवाद ठरल्या आहेत. कोल्हेंनी मंदीर साफसफाई मोहीमेच्या निमित्ताने कोपरगाव शहरातील राम मंदीराची साफसफाई करताना केवळ फोटो पुर्ती साफसफाई न करता पदर खोचून हातात पोचारा घेवून चक्क खाली बसुन फरशा पुसल्या तसेच काय तर मंदिराचा कोणान कोणा पुसत होत्या. कोल्हे यांच्या साफसफाईने उपस्थित महीला कार्यकर्त्या अचंबित झाल्या. 

स्नेहलता कोल्हे यांनी मनोभावे रामभक्त म्हणून स्वच्छता करीत असल्याचे दिसुन आले. अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या श्रीराम मंदिरात मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशवासियांना आपल्या गावातील तीर्थक्षेत्र आणि मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी शहरातील श्रीराम मंदिरात सेवा व परिसरात साफसफाई केली.

त्यांनी स्वत: हातात झाडू, मॉप घेऊन श्रीराम मंदिराचा सभामंडप, परिसर स्वच्छ केला व सर्वच मंदिरे आपण सर्वांनी मिळून स्वच्छ करून राम मंदिरोत्सव आनंदाने साजरा करू अशी विनंती उपस्थितांना केली. तसेच श्री महादेव मंदिरातही त्यांनी साफसफाई केली. याप्रसंगी श्रीराम मंदिर ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, महिला भगिनी, श्रीरामभक्त, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने सर्वांनी २२ जानेवारीला संध्याकाळी घरोघरी श्रीराम ज्योत प्रज्वलित करावी. श्रीराम दीप, कंदील लावून अभूतपूर्व अशी दिवाळी साजरी करावी. विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करून या आनंदोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन स्नेहलता कोल्हे यांनी जनतेला केले.