राहुरी येथील वकील दाम्पत्यांच्या खुनाचा कोपरगाव वकील संघाने केला निषेध

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२९ : राहूरी येथील न्यायालयात वकीली करणाऱ्या पती-पत्नीची झालेल्या हत्येचा कोपरगाव वकील संघाच्यावतीने न्यायालयीन कामकाज बंद ठेवुन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. अधिक माहती अशी की, दि.25 जानेवारी 2024 रोजी अॅड. राजाराम आढाव व अॅड. मनिषा आढाव या दाम्पत्याची अतिशय क्रुरपणे हत्याा करण्यात आली.

या घटनेने वकीलांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावरून आरोपी कीती निर्ढावले आहेत याचा प्रत्यय येतो. समाजातील या वाईट अपप्रवृत्ती पासुन वकीलांना कायद्याने सरंक्षण मिळणे गरजेचे आहे. त्याकरीता राजस्थानच्या धरतीवर महाराष्ट्रातही अॅडव्होकेट प्रोटेक्षन बिल मंजुर करून वकीलांना संरक्षण द्यावे असे निवेदन महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशन यांना पाठविण्यात येणार आहे.

दरम्यान सदर घटनेचा निषेध म्हणुन कोपरगावचे तहसिलदार संदीपकुमार भोसले, कोपरगाव पोलीस निरीक्षक यांना निवेदन देवुन अॅड. राजाराम आढाव व अॅड. मनिषा आढाव श्रध्दांजली देण्यात आली. यावेळी वकील संघाचे अध्यक्ष ॲड. एम पी येवले, ॲड. ए. डी टूपके, ॲड. शरद गुजर, अशोक वहाडणे, ॲड. भास्कर गंगावणे, ॲड. शंतनू धोर्डे, ॲड. जयंत जोशी,  ॲड. विजय गवंदे, ॲड. के.बि. शिंदे, ॲड. विद्यासागर शिंदे, ॲड. साहेबराव खालकर, ॲड. एस एम वाघ, ॲड. गुजाराथी, ॲड. योगेश खालकर, ॲड. अतिश अगवान,  ॲड. मनोज कडू, ॲड. संजय मंडलिक, ॲड. अमोल टेके, ॲड. निलेश पवार, 

 ॲड. महेश भिडे, ॲड. एस एम मोकळ,  ॲड. प्रकाश बोलागामावर, ॲड. योगेश जाधव, ॲड. व्ही टी सुपेकर, ॲड. ज्योती भुसे, ॲड. एस. डी. गव्हाणे, ॲड. विकास सदाफळ, ॲड. दिपक पोळ, ॲड एम यु सय्यद, ॲड. शितल देशमुख, ॲड. रफिक शेख, ॲड. अर्शद शेख, ॲड. गणेश मोकळ, ॲड. दीपक जाधव, ॲड. केतन शिरोडे, ॲड. संदीप सांगळे, ॲड. गणेश भोकरे, ॲड प्रशांत मोकळ, ॲड. निलेश कातकडे,  ॲड. जी जी गुरसळ, ॲड. लोणारी, ॲड. सतीश बोरुडे  आदि उपस्थित होते.