एस.एस.जी.एम.महाविद्यालयाचा मतदार जागृती कार्याबद्दल सन्मान

कोपरगाव प्रतिनिधी, दि.३० : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त दि.२५ जानेवारी २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे युवावर्गामध्ये मतदार जागृतीच्या संदर्भात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या, श्री सद्गृरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव या महाविद्यालयाचा मा.जिल्हाधिकारी, सिद्धराम सालीमठ यांचे हस्ते गौरव करण्यात आला.

महाविद्यालयाचे मा.प्राचार्य.डॉ.सानप आर.आर.यांचे मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात निवडणूक साक्षरता मंडळ निर्माण करून विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी, तसेच यासंदर्भात कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती.

या संदर्भात निवडणूक कार्यालय, अहमदनगर, वर्शिप अर्थ फौंडेशन( स्वयंसेवी संस्था) यांचेशी अंतर्गत सामंजस्य करार झालेला असून त्या अंतर्गत मतदारांमध्ये जनजागृती केली जात आहे. राज्यशास्त्र विभागाच्या प्रमुख.प्रा.डॉ.सुपेकर व्ही.पी.यांनी नोडल ऑफिसर म्हणून काम पहिले. तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य या उपक्रमास लाभले.