समता पतसंस्थेचे कामकाज देशातील बॅंकांना दिशादर्शक – शिवकुमार पाटील

कोपरगाव प्रतिनिधी दि.३१ :  समता सहकारी पतसंस्थेची कार्यप्रणाली व सुरु असलेली आधुनिक सुविधा ही राज्यासह देशातील बॅंकींग क्षेञाला दिशा देणारी आहे असे मत सिध्देश्वर सहकारी बॅंक लातूरचे चेअरमन शिवकुमार पाटील (रायवाडीकर) यांनी व्यक्त केले. 

राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या अधिपत्याखाली सुरु असलेली समता नागरी सहकारी पतसंस्था हि राज्यातील पतसंस्थापैकी एक नावाजलेली पतसंस्था आहे. राज्यभरातील अनेक मान्यवर समता पतसंस्थेचं कामकाज पहाण्यासाठी येत असतात. राज्यात लातूर पॅटर्नची चर्चा सर्व असते पण लातूरच्या सिध्देश्वर सहकारी बॅंकेच्या सर्व संचालक मंडळांनी सोमवारी कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाला सदिच्छा भेट देवून संस्थेचे एकुण कामकाज कसे चालते. कर्मचारी कोणत्या आधुनिक प्रणालीद्वारे कामकाज करतात. 

समतामधील एकुण ठेवी कशा व किती आहेत? कर्ज पुरवठा कसा केला जातो? कर्ज वसुली पध्दत, नवीन योजना अद्यावत प्रणालीद्वारे कोणता फायदा होतो? याची सखोल माहीत संस्थेचे अभ्यासु संचालक संदीप कोयटे यांच्याकडून समाजावून घेत होते. संदीप कोयटे यांनी नव्या कल्पनेतून साकारलेली समता पतसंस्था एखाद्या कार्पोरेट बॅंकेला लाजवेल अशी कार्यप्रणाली वापरून काम करते.

कर्जदाराला अवघ्या १४ मिनिटात कर्ज पुरवठा करते. पारदर्शक काम करुन ग्राहकांचा विश्वास संपादन करणारी समता असल्याने समताचं जाळ राज्यात पसरत आहे. कर्जदार कितीही जवळचा असला तरी कर्जवसुली मध्ये हायगय केली जात नाही. वसुली वरून सिफारस करणाऱ्याला दंड बसवला जातो. त्यामुळे खुद्द चेअरमनला सुध्दा दंड भरावा लागतो. येथे वशिलेबाजी चालत नाही असेही संदीप कोयटे सांगताच सिध्देश्वर सहकारी बॅंकेचे चेअरमन सह सर्व संचालक कुतुहलाने कोयटे यांच्याकडे पहात होते. 

यावेळी समता परिवाराच्यावती संदीप कोयटे यांनी सिध्देश्वर सहकारी बॅंकेचे चेअरमन शिवकुमार पाटील, व्हा. चेअरमन ॲड. उमाशंकर पाटील, संचालक रामचंद्र आलुरे, डॉ. कल्याण उटगे, राजेंद्र मुंडे, ॲड. शिवराज सुगरे, भिमाशंकर बेंबळकर, युवराज लोखंडे, चंद्रकला रोट्टे, सुखदा मांडे, सुनिता लोहारे, बॅंकेचे कर्मचारी प्रशांत मिटकरी, दिपक पाटील, सुर्यकांत मोरे, व शैलेश खराडे यांचा विशेष सन्मान केला.

यावेळी चेअरमन शिवकुमार पाटील म्हणाले की, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या कल्पक विचारांमुळे राज्यातील पतसंस्थांना बळकटी मिळत आहे. काका कोयटे यांच्या पावलावर पाऊल टाकत संदीप कोयटे हे एक पाऊल पुढे जाऊन काम करीत आहेत. समताच्या कार्यप्रणालीचा लातूरच्या बॅंकेला लाभ होणार असेही ते म्हणाले. लातुरमध्ये समता पॅटर्न राबवण्याची लगबग करणार असल्याचे यावेळी सांगितले.