श्री रेणुका मल्टी स्टेट संस्थेत हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहात साजरा

शेवगाव प्रतिनिधी, दि०४ :  विविध उपक्रम साजरे करून सातत्याने जनसंपर्क वाढविण्यात श्री रेणुका मल्टी स्टेट कोऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी ही संस्था माहिर आहे. कृषी दिन, डॉक्टर्स डे, शिक्षक दिन, जागतिक महिला दिन, इंजिनिअरीग तसेच पत्रकार व ज्येष्ठ नागरिक दिन असे अनेक उपक्रम संस्थेत राबविले जातात. या उपक्रमाचे औचित्य साधून सर्व संबंधिताना पाचारण करून त्यांना सन्मानित करण्याची संस्थेची प्रथा आहे.

देशातील नऊ राज्यातील तब्बल१३८ शाखांमध्ये राबविण्यात येणाऱ्या अशा सोहळ्यामुळे लाखो व्यक्ती संस्थेच्या शाखांत येतात. त्यांचा सन्मान तर केला जातो शिवाय या निमित्ताने त्यांना संस्थेच्या प्रगतीपर कामकाजाची माहिती ही अनायासे होत असते. त्यातून अनेक जाणकार नागरिक संस्थेसी कायमचे जोडले जातात. नुकताच मकर संक्रांति निमित्त होत असलेल्या हळदीकुंकू समारंभ देखील संस्थेच्या या सर्व शाखातून मोठ्या उत्साहात राबविण्यात आला आहे.   

शेवगावातील पंचायत समिती मार्गावरील श्री रेणुका मल्टीस्टेट संस्थेच्या शाखेत संक्रांती निमित्त हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला. या समारंभास विविध स्तरातील असंख्य महिलांनी शाखेला भेट देऊन हळदीकुंकू घेऊन वाण लुटले. आणि जातांना श्री रेणुका मल्टी स्टेट या संस्थेच्या विविध सोयी सवलतींची माहिती ही घेतली.

रेणुका भक्तानुरागी मंगल भालेराव यांचे प्रमुख उपस्थितीत झालेल्या या हळदीकुंकू समारभांस, जयंती भालेराव, रेखा भालेराव, सरला बडधे, रेखा नांगरे, डाॅ. सोनवणे, अनिता बुधवंत, सत्यभामा गोरे, वर्षा सुडके, पुनम शेळके, मंदा तागड, छाया लोखंडे, प्रतिमा भराट, प्रयागा गाढे यांचे सह विविध स्थरातील मान्यवर महिलांनी उपस्थिती लावली.

शाखेच्या वरिष्ठ अधिकारी मीना गाढे, माधवी कसबे, स्मृति भाडाईत यांनी सर्वांना हळदी कुंकु देऊन वाण वाटप केले. संस्थेचे सवव्यवस्थापक राजेंद्र नांगरे यांचे मार्गदर्शनाखाली गणेश सुरूसे, ज्ञानेश्वर झिरपे, राजेद्र सराफ यांनी परिश्रम घेतले.