पी.बी.शिंदे यांनी पायी नर्मदा परिक्रमा ११० दिवसात केली पूर्ण

शेवगाव प्रतिनिधी, दि.१४ :  योग तज्ञ परमपूज्य दादाजी वैशंपायन यांचे येथील ज्येष्ठ साधक पी. बी. शिंदे यांनी खङतर अशी सुमारे साडेतीन हजार किलोमीटर अंतराची पायी नर्मदा परिक्रमा ११० दिवसात पूर्ण केली. श्री क्षेत्र ओंकारेश्वर येथून त्यांनी नर्मदा परिक्रमा सुरू केली होती. दोन दिवसापूर्वी संपूर्ण परिक्रमा पूर्ण करून ते परत ओंकारेश्वर येथे आले असून शुक्रवारी नर्मदा जयंती निमित्ताने नर्मदेचे स्नान करून शनिवारी त्याचे आगमन शेवगावी होणार आहे.

येथील दादाजी वैशंपायन नगरातील दत्त मंदिरात साधक शिंदे यांचा दत्त भक्त परिवाराच्या व मित्र मंडळाच्या वतीने स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास शेवगाव व परिसरातील दत्त भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकाच्या वतीने श्री गुरुदत्त सामाजिक शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष अर्जुन फडके, सचिव फुलचंद रोकडे, हनुमान जोशी, प्रकाश बाहेती, डॉ. सुभाष बाहेती व मित्र मंडळाने केले आहे.