भारतीय जनता पार्टीच्या शहर अध्यक्षपदी बापूराव धनवडे व भाजपा युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षपदी महेश फलके यांची नियुक्ती

शेवगाव प्रतिनिधी, दि.१५ :  भारतीय जनता पार्टीच्या शहर अध्यक्षपदी बापूराव नामदेव धनवडे तर भाजपा युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षपदी माजी नगरसेवक महेश उर्फ रिंकू सुधाकर फलके यांची नियुक्ती झाली आहे. नव नियुक्त पदाधिकारी आमदार मोनिका राजळे यांचे कट्टर समर्थक म्हणून शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात त्यांची ओळख आहे.

पक्षाचे नगर दक्षिणचे जिल्हा अध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी या नियुत्या नुकत्याच जाहीर केल्या आहेत. नवनियुक्त पदाधिकारी धनवडे व फलके यांचा आमदार राजळे यांच्या शेवगाव येथील संपर्क कार्यालयात कृषक समाजाचे राज्याध्यक्ष, ज्येष्ठ नेते बापूसाहेब भोसले, बापूसाहेब पाटेकर यांच्या हस्ते माजी जि. प. सदस्य अशोक आहुजा यांच्या सह मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.

यावेळी नितीन मालानी, अमोल घोलप, अण्णासाहेब ढोबळे, संतोष कंगनकर, माजी नगरसेवक गणेश कोरडे सरपंच विष्णू घनवट, सोनई येथील सरपंच संदीप कुसळकर, सुभाष राख, वांबोरी येथील गणेश कुसमुडे, कैलास सोनवणे यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आहूजा म्हणाले, शेवगाव शहरात भारतीय जनता पक्षाला मोठा जनाधार मिळालेला आहे. मागील लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत खासदार डॉक्टर सुजय विखे व आमदार मोनिका राजळे यांना शहरात मोठे मताधिक्य मिळाले आहे. शेवगाव नगरपरिषदेच्या दुसऱ्या अडीच वर्षाच्या कालावधीत येथील नगरपरिषदेवर भारतीय जनता पक्षाचा प्रथमच झेंडा लागला असून शहरातील विविध प्रभागात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत.

त्यामुळे शहरातील सर्व प्रभागात भारतीय जनता पक्षाची शाखा कार्यान्वित करून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना भाजपा मध्ये सामील करून घेऊन शहरात भाजप पक्ष संघटना अधिक बळकट करण्याचे कार्य नूतन पदाधिकारी निश्चीत करतील. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पाटेकर यांनीही मार्गदर्शन केले. भाजपा अनुसूचित जाती जमाती जिल्हा उपाध्यक्ष भगवान मिसाळ यांनी आभार मानले.