अरुण मुंढे यांच्या हस्ते सभामंडपाचे भूमिपूजन

शेवगाव प्रतिनिधी, दि.१६ :  खासदार डॉ. सुजय विखे यांच्या विकास निधीतून शेवगाव येथील श्री स्वामी समर्थ मंदिरासमोरील जागेत सभा मंडपासाठी दिलेल्या पंधरा लाख रुपये खर्चाच्या सभा मंडपाचे कामाचे भूमिपूजन व शुभारंभ भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंढे यांच्या उपस्थितीमध्ये श्रीफळ वाढवून करण्यात आला.

याप्रसंगी मुंढे यांच्या पत्नी माया मुंढे, नगरसेवक दिगंबर काथवटे, माऊली खबाले, उद्धव सोनवणे, भूषण देशमुख, पृथ्वीराज देशमुख, ठेकेदार भगवान डावरे, तारा रेवडकर, मीना ढाकणे, निवेदिता ढोले, संजीवनी नरसाळे, मनीषा घुमरे व परिसरातील कार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.