कोपरगावच्या एसजेएस मेडीकल काॅलेजमध्ये हिंदू मुलांकडून नमाज पठण?

कोपरगाव प्रतिनिधी, दि.‌२७ : कोपरगाव येथील संत जनार्दन स्वामी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रावणी समीर यारणाळकर व त्यांचा सहकारी अस्लम झाकीर नदाफ याने महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या हिंदू मुला-मुलींकडून महाविद्यालयात सामुदायिक नमाज पठण करुन घेतल्याने खळबळ उडाली आहे.

या संदर्भातील तक्रार संस्थेचे अध्यक्षांनी केल्याची खळबळ उडाली आहे. या घटनेची कोपरगाव शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सोमवारी कोकमठाण शिवारातील संत जनार्दन स्वामी (एसजेएस) वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या क्रिकेट व कबड्डी स्पर्धा सुरु होत्या त्याच स्पर्धा वरून दोन संघात वादविवाद झाला. तो वाद सोडवण्यासाठी सुरक्षा रक्षक प्रमुख प्रज्योत राजू पवार हे गेले व त्यांनी तो वाद मिटवला.

सुरक्षा रक्षक पवार यांनी वाद मिटवल्याचा राग तेथील कर्मचारी व प्राचार्य श्रावणी यारणाळकर यांचा खास सहकारी अस्लम झाकीर नदाफ याला आला. अस्लम नदाफ याने त्याचा भाऊ मोबीन झाकीर नदाफ यास जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर हल्ली एसजेएस या कर्मचारी वसाहतीत राहतात. यांनी संगमताने सुरक्षा रक्षक प्रज्योत पवार यांच्या खाजगी खोलीत जावून त्यांना शिवीगाळ करून चाकुचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली.

एसजेएस हाॅस्पिटलच्या परिसरात वादविवाद सुरु असल्याने एकच पळापळ सुरु झाली. सायंकाळी साडे सहा वाजता हा सर्व प्रकार घडल्याने बघ्यांची गर्दी झाली. सुरक्षा रक्षकाने मोबीन नदाफच्या हातातील चाकु हिसकावून घेतला व कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये जावून पवार यांनी अस्लम झाकीर नदाफ व त्याचा भाऊ मोबीन झाकीर नदाफ यांच्या विरोधात राञी उशिरा तक्रार दिली व गुन्हा दाखल करण्यात आला. 

दरम्यान या घटनेतील आरोपी अस्लम नदाफ व प्राचार्या श्रावणी यारणाळकर यांनी  याच महाविद्यालयात हिंदू मुला-मुलींकडून नमाज पठण करुन घेतल्याचे माहिती परिसरातील काही हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कळाली. सदर घटनेचा निषेध करीत संबंधितांवर त्वरीत गुन्हा दाखल करावा. या मागणीसाठी कोपरगाव सकल हिंदु संघटनेचे कार्यकर्ते राञी उशिरापर्यंत कोपरगाव शहर पोलीस स्टेशन समोर ठिय्या मांडला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी घटनेची माहिती वरिष्ठांना कळताच पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांनी पोलीस स्टेशनमध्ये येवून सर्वांची बाजू समजावून घेतली. एसजेएस वैद्यकीय महाविद्यालय व हाॅस्पिटलचे अध्यक्ष चांगदेव कातकडे व त्यांचे सहकारी यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेवून हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना व पोलीसांना आपली बाजू पटवून सांगितली.

माञ, आक्रमक झालेल्या हिंदू  कार्यकर्त्यांनी संबंधीत प्रकारावर नाराजी व्यक्त करीत वैद्यकीय महाविद्यालयातील नमाज पठणाने फोटो व इतर पुरावे कातकडे यांना दाखवले अखेर राञी बारा वाजता संस्थेचे अध्यक्ष चांगदेव नारायण कातकडे यांच्या तक्रारीवरुन एसजेएस वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रावणी समीर यारणाळकर व त्यांचा सहकारी तसेच एसजेएस चा कर्मचारी अस्लम झाकीर नदाफ यांच्या विरोधात हिंदू मुला-मुलीं जबरदस्तीने नमाज पठण करून हिंदू धर्म व धार्मीक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी वरील दोन्ही गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना तातडीने अटक करून गजाआड केले. तर प्राचार्या श्रावणी समीर यारणाळकर यांनाही अटक करण्याची व्यवस्था पोलीस करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी दिली. 

दरम्यान या घटने बद्दल आपली भुमिका स्पष्ट करताना एसजेएस वैद्यकीय महाविद्यालयाचे अध्यक्ष चांगदेव कातकडे म्हणाले की, एसजेएस महाविद्यालयात २५ डिसेंबर २०२२ साली हिंदू मुला-मुलींसह सर्वच धर्माच्या विद्यार्थ्यांनी सामुदायिक नमाज पठण केल्याचा फोटो आज समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. माञ, तो एकच फोटो नसुन त्याच वेळी एका सामुदायिक उत्सवाच्या दरम्यान सर्वधर्म समभाव ही थीम घेवून सर्वच विद्यार्थ्यांनी आरती, पुजा पाठ सह नमाज पठणाचा देखावा सादर करणारे तेच मुलं-मुली नमाज पठण करतानाचा एक क्षण फोटोत टिपला.

पण सर्व जाती धर्माचे तेच विद्यार्थी हिंदू संस्कृती प्रमाणे आरती म्हणतात, त्यात मुस्लीम समाजाचेही विद्यार्थी होते. आणि नमाज पठण करतानाही सर्व समाजाचे मुलं होती. तो केवळ एक मनोरंजनाचा देखावा होता. अशी माहिती आम्हाला मिळाली होती. परंतु नमाज पठण जाणुनबुजून करून घेतले असेल तर त्यांना संस्था पाठीशी घालणार नाही. असे म्हणत कातकडे यांनी संस्थेची भूमिका स्पष्ट केल्याने सध्या तरी वादावर पडदा आहे.