कोपरगाव प्रतिनिधी, दि.०६ : कोपरगाव येथील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयातील अनिल भिकाजी अमृतकर यांना स्व.कमलिनी सातभाई शासन मान्य सार्वजनिक वाचनालय-ग्रंथालयाच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील योगदाना बद्दल दिला जाणारा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
अनिल अमृतकर हे विदयालयात कला शिक्षक म्हणून कार्यरत असुन त्यांनी कला व सांस्कृतिक क्षेत्रात चांगले काम केले आहे. त्यांच्या या यशा बद्दल कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे सचिव दिलीप अजमेरे, स्थानिक स्कुल कमिटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे, सहसचिव सचिन अजमेरे, संदीप अजमेरे, डॉ.अमोल अजमेरे, राजेश ठोळे, आनंद ठोळे, मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर, उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड, पर्यवेक्षक उमा रायते, विदयालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदिनी अभिनंदन केले आहे.
या पुरस्काराने मला आनंद मिळाला असुन कला क्षेत्रासाठी चांगले कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

