कोपरगाव प्रतिनिधी, दि.०७ : पक्षांना होणारा विषाणू आजार हा इन्फ्लुएंझा या व्हायरसच्या संक्रमणामुळे होतो. विषाणू हे निसर्गात नियमित आढळतात. परंतु त्यांच्या जनुकात बदल झाला कि, ते पक्षांमध्ये प्राण्यांमध्ये संक्रमित होतात व झपाट्याने वाढून आपले रौद्र रूप दाखवतात. त्यामुळे पौलट्री फार्म व प्राण्यांचे मोठे नुकसान होते.
पक्षांना या विषाणू पासून वाचवण्यासाठी फक्त त्यांची रोगप्रतिकार शक्ती कार्य करते. निसर्गातील विषाणूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी पक्षांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे गरजेचे असते. यावर संशोधन करून अश्वमेधने हर्बल अँटी व्हायरल फॉर्म्युलेशन विकसित करून त्याचे पौलट्रीसाठी पेटंट 2022 मध्ये पब्लिश केले आहे.
पक्षी आणि प्राण्यांना विषाणू पासून मुक्त ठेवण्यासाठी व त्यांची रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी वनस्पतीवर आधारित पौल्ट्रीका औषधाची निर्मिती करून भारतीय पेटंट 2022 मध्ये प्रकाशित केले आहे.
पौल्ट्री म्हणजे पक्षी फार्म आणि का म्हणजे काऊ (गाय) पौल्ट्रीका हे उत्पादन अश्वमेधने नुकतेच बाजारात देऊन मागील वर्षी लंम्पि विषाणू आजारापासून हजारो जनावरे मुक्त केले व पौल्ट्री फार्मसाठी विषाणू आजारावर ते कारागार ठरणार आहे. असा दावा प्रख्यात संशोधक डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी केला आहे.