शिर्डी लोकसभेसाठी खा.सदाशिव लोखंडे हेच उमेदवार – भाऊसाहेब चौधरी

कोपरगाव प्रतिनिधी, दि.७ : काही दिवसापासून वृत्तपत्रातून शिर्डी लोकसभेसाठी खासदार म्हणून अनेकांच्या अपेक्षा असल्याच्या वावड्या उठल्या मात्र, शिर्डी लोकसभेतून निवडून गेलेले खा. सदाशिव लोखंडे यांनी निळवंडे कालव्याच्या बाबतीत संसदेत लक्षवेधी सूचना मांडली जलदिंडी काढली पोटतिडकीन निळवंडे कालव्याचा प्रश्र त्यांनी मार्गी लावला.

त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील 182 जिरायती गावांचा पाण्याचा प्रश्न सुटला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय खासदार म्हणून त्यांची ओळख आहे. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी खा. सदाशिव लोखंडे यांनाच पुन्हा एकदा लोकसभेवर पाठवायचे आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी ही निश्चित करण्यात आली असल्याचे सांगत शिवसैनिकांनो लोकसभेसाठी कामाला लागा असे आवाहन शिवसेनेचे सचिव व उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी केले.

ते कोपरगाव तालुक्यातील शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी, शिवसेनेच्या अंगीकृत संघटनांच्या पदाधिकारी, शिव दूत बूथ प्रमुख शाखाप्रमुख व शिवसैनिक यांच्या शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात चांदेकसारे येथे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. सदाशिव लोखंडे होते. यावेळी शिवसेना नेत्या मीना कांबळी, उपनेत्या तृष्णा विश्वास, पक्ष निरीक्षक राजेंद्र चौधरी, शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन, कमलाकर कोते, शिवसेना नेते भगीरथ होन,

बाजार समिती संचालक सर्जेराव कदम, मीनाक्षी वाकचौरे, विमल पुंडे, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार, बाजीराव दराडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब रहाणे, देवा लोखंडे, शिवसेना तालुकाप्रमुख संजय गुरसळ, रावसाहेब थोरात, जिल्हा समन्वयक शिवाजी जाधव, अभिषेक आव्हाड, अक्षय गुंजाळ, शिवसेना शहर प्रमुख अक्षय जाधव, सरपंच अमोल औताडे, सचिन शिंदे, रियाज शेख, राजेंद्र औताडे अदीसह शिवसेनेचे कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

स्वागत रावसाहेब थोरात यांनी केले , प्रास्ताविक बाळासाहेब रहाणे यांनी केले. शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन औताडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विकासात्मक दृष्टिकोन असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, खा. श्रीकांत शिंदे यांच्या विचारावर प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, पंधरा दिवसातच त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून जिल्हा प्रमुख पदावर काम करण्याची संधी दिली. त्यांचा विश्वास सार्थ करण्यासाठी शिवसेनेतील सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन शिवसेना पक्षाची ताकद वाढवण्यासाठी जास्तीत जास्त पक्ष संघटनेवर भर देऊन गाव तेथे शाखा स्थापन करु.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी पुन्हा एकदा शिर्डी लोकसभेतून खा. सदाशिव लोखंडे यांनाच विजयी करण्यासाठी एक निष्ठेने काम करू असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. पक्ष निरीक्षक राजेंद्र चौधरी व शिवसेना नेत्या मीना कांबळी यांनी देखील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तर खासदार सदाशिव लोखंडे यांनी सांगितले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धाडसी निर्णयामुळेच मी निळवंडे धरणाच्या कालव्यांचे काम पूर्ण करू शकलो.

जवळपास 5177 कोटी रुपये निधी यासाठी मिळाला. मी शिर्डीच्या साईबाबांचा खासदार असून कोणत्याही माध्यमातून खोटी आश्वासने देणार नाही. माझ्या कामाचा कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता शेवटच्या घटकापर्यंत काम करीत राहणार असून घाटमाथ्याचे समुद्राला वाहून जाणारे पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे वळून नगर-नासिक व मराठवाड्याचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी आभार जिल्हा समन्वयक शिवाजी जाधव यांनी मानले.