कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०२ : राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे विभागीय अध्यक्ष मा. दिलीपराव कानडे यांना चर्मकार समाजाकरीता केलेल्या भरीव कामगिरीची दखल घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा उन्नती मंडळाच्या वतीने देण्यात येणारा मानाचा “संत रविदास समाजभुषण” पुरस्कार सिंधुदुर्ग येथे आमदार वैभव नाईक यांचे शुभहस्ते प्रदान करुन गौरविण्यात आले.
अध्यक्ष पदावरुन बोलताना आमदार नाईक म्हणाले, दिलीप कानडे यांच्या सामाजिक, कार्याबद्दल कौतुक, करताना विशेष आनंद होत आहे. समाजासाठी अहोरात्र झटणाऱ्या चांगल्या कर्तृत्ववान व्यक्तीच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन, संत शिरोमणी गुरु रविदास समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केल्याबद्द्ल सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार उन्नती मंडळाच्या सर्व पदाधिकारी यांचे आभार मानुन चर्मकार समाज आजही अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत असुन, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे नेते दिलीप कानडे यांचे सारखे कार्यकर्ते कुटुंबाची पर्वा न करता, समाज्याच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहचत न्याय मिळवून देण्यासाठी व सामाजिक कार्यासाठी लढतात. आशा योग्य व्यक्तींना समाज भूषण पुरस्कार देताना, मला मनस्वी आनंद समाधान मिळाल्याचे गौरवोद्गार आमदार वैभव नाईक यांनी काढले.
सत्काराला उत्तर देतांना दिलीपराव कानडे यांनी काही आठवणी सांगत शिवसेना उपनेते माजीमंत्री बबनराव घोलप, यांच्या विचारांचा प्रभाव माझ्यावर असुन, त्यांचा असणारा विश्वास सार्थ ठरवत, चर्मकार समाजाच्या उन्नतीसाठी सतत प्रयत्नशील असतो. यापुढेही रात्रंदिवस काम करण्याची, ऊर्जा या पुरस्काराने दिल्याचे सांगुन दिलीप कानडे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार उन्नती मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले.
यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार उन्नती मंडळाचे अध्यक्ष सुजित जाधव, कार्यध्यक्ष विजय चव्हाण, चंद्रसेन पठाडे, अँड. अनिल नरवडेकर, रविकिशोर चव्हाण यांचेसह विविध पक्ष, संघटनेचे पदाधिकारी यांनी कानडे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी समाजातील जेष्ठ, युवक, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुरस्कार मिळाल्याबद्दल राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आमदार भाऊसाहेब कांबळे, आमदार आशुतोष काळे, कार्याध्यक्ष भानुदास विसावे, मनिषाताई पोटे, रविंद्र पाठक, जिल्हाध्यक्ष अशोक कानडे, जिल्हा संपर्क प्रमुख अँड. संतोष कांबळे, युवा जिल्हाध्यक्ष दत्तात्रय दुशिंग, तुषार पोटे, तालुकाध्यक्ष माधवराव पोटे, गणेश कानडे, देविदास कानडे, संजय पोटे, संतोष दळवी, संतोष कानडे, संतोष शिंदे, अँड रमेश दुशिंग आदींनी अभिनंदन केले.