महिलांचा सन्मान एका दिवसापुरता नको कायम असावा – स्नेहलता कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०७ : आपल्या भारतीय संस्कृतीत महिलांचे महत्त्व मोठे आहे. महिलांना मानाचे स्थान पुरातन काळापासून देण्यात आले आहे. म्हणुन पोथी पुराणांमध्ये महिलांना देवीची उपमा देण्यात बरोबरच स्ञी म्हणजे घरातली लक्ष्मी म्हणून पाहीले जाते. पण बदलत्या काळात स्ञियांना कायद्याने जरी स्वातंत्र्य मिळाले किंवा पौराणिक कथा पुराणात जरी तीला लक्ष्मी म्हणत असले तरी. पुरुषप्रधान संस्कृती स्ञियांना दुय्यम दर्जाचे स्थान काही ठिकाणी आजही दिले जाते. 

आपल्या संस्कृतीत घरातील धनदौलत मुबलक असावी म्हणून लक्ष्मीची आराधना करतात. नवराञ उत्सवातील नवदुर्गेची पुजा करतात, विद्या प्राप्त  व्हावी म्हणुन सरस्वती, आपलं आरोग्य कायम सुदृढ असावं म्हणून धन्वंतरीची आराधना करतात. इतकेच काय तर जन्म देणाऱ्या मातेला देवाची उपमा देतात. घरात जन्मलेल्या मुलीला लक्ष्मीच्या पावलाने आली महणतात. सर्व बाजुंनी पुरुष मंडळी स्ञियांच्या नावाचे कौतूक करीत जयजयकार करत असताना.

दैनंदिन जीवनात माञ, सहज बोलताना सुध्दा स्ञियांच्या नावाने शिव्या दिल्या जातात, त्यांच्या नावानेच अश्लिल भाषेचा वापर केला जातो. स्ञियांच्या जन्माचे जितके कौतूक होते त्या पेक्षा अधिक वेळा पुरुष त्यांच्या संपूर्ण जीवनात सहज बोलता बोलता आई बहिणीच्या नावाने इतरांना शिव्या देतात हे आता कुठे तरी बदलले पाहिजे. जिथे स्ञीचा सन्मान होतो तिथेच त्यांच्या नावाने सहज शिव्या दिल्या जातात. केवळ जागतिक महिला दिना पुरतं महिलांचं कौतूक करण्यापेक्षा कायमस्वरूपी वागण्यातून बोलण्यातून स्ञीयांचे कौतूक झाले तरच खऱ्या अर्थाने देवी रुपात वावरणाऱ्या तमाम स्ञियांना समाधान होईल.

कायदा, अधिकार जरी समान दिला तरी पुरुष प्रधान संस्कृतीत स्ञीयांचे स्थान आजून दुय्यम असल्याचे या वैचारीक मानसिकतेतून दिसुन येते. कोणी कितीही स्ञियांचा हेवा केला, अपमान केला तरी आजची स्त्री आपल्या कर्तव्यापासून कनभरही दूर जात नाही. ती आपल्या संस्कृतीचे जतन करते. पुरुषांचा आदर करते म्हणुनच आपली ही संस्कृती जगात महान आहे. जगामध्ये भारतीय स्ञीयांच्या कार्याची उंची अधिक आहे. कोणी कितीही तिच्या नावाचा उध्दार केला तरी तीच या जगाची जननी आहे. 

फक्त तिला मुखातून शिव्या ऐवजी गोडवा हवा. किमान यापुढे तरी स्ञीयांच्या नावाने शिव्या देवून नये. आजपर्यंत मान दिला मग शिव्या तर का द्याव्या? या पुढे द्यायचे असेल तर स्ञियांना मान सन्मानच द्यावा. अशा भावना माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त करीत जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या.