जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मोफत आरोग्य शिबीर संपन्न

शेवगाव प्रतिनिधी, दि.८ :  कुटुंबात महिलां अतिशय महत्वाची भूमिका पार पाडत असते. घरातील अबालवृध्दांच्या आरोग्या सह इतर सर्व प्रकारची काळजी घेणाऱ्या महिलांचे स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष होते. महिलाचे आरोग्य चांगले असेल तर त्या आपल्या कुटुंबाची काळजी व्यवस्थित रित्या घेऊ शकतील. म्हणून महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी आपणच घ्यायला हवी असे प्रतिपादन माजी जीप अध्यक्षा राजश्री घुले यांनी केले.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून घुले फाऊडेंशनच्या वतीने तालुका मेडिकल असोसिएशनच्या सहकार्याने शुक्रवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मारुतराव घुले मंगल कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित मोफत आरोग्य शिबीर तसेच नोंदणी कृत इमारत बांधकाम कामगार महिलांना  ग्रहोपयोगी वस्तू संचाचे वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यावेळी कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिला अधिकारी तसेच त्यांच्या आईंचा सन्मान करण्यात आला. २५३ हमारत बांधकाम कामगार  महिलांना घरघुती वापराच्या ३० वस्तूचा संच वितरीत करण्यात आले. तसेच श्रीराम मंदिर सोहळ्याच्या निमित्ताने स्वामी विवेकानद तरुण मंडळाच्या वतीने पार पडलेल्या रांगोळी स्पर्धेतील पारितोषिक विजेत्या महिला मुलींचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी डॉ. मेधा कांबळे, डॉ. गणेश चेके, डॉ. दिनेश राठी, डॉ. चैतन्य पंचघाटे यांनीही मार्ग दर्शन केले. रागिणी लांडे, संगिता देशमुख, सुनिता काथवटे, डॉ. स्मिता लांडे, बाजार समितीचे सभापती एकनाथ कसाळ, उपसभापती गणेश खंबरे, संचालक मनोज तिवारी, डॉ. संदिप नांगरे, डॉ. दिग्विजय नेहूल, उषा नरवडे, रोहित काथवटे, आदिसह विविध महिला बचत गटाच्या पदाधिकारी व सदस्या, बांधकाम महिला कामगार उपस्थित होत्या.

प्रा. अशोक उगलमुगले यांनी स्वागत व प्रास्तविक केले, मच्छिंद्र पानकर यांनी सुत्रसचलन केले. तर संगिता गायकवाड यांनी आभार मानले.