कांदा अनुदान व पीक विम्यासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरू नका – विवेक कोल्हे

कोपरगाव तहसील कार्यालयात आयोजित समस्या निवारण बैठकीत जनहिताच्या विविध प्रश्नांवर चर्चा 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १० : शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या कांदा अनुदानासाठी अपात्र झालेल्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर करून त्यांना तातडीने अनुदान द्यावे. राज्‍य शासनाने शेतकऱ्यांसाठी केवळ १ रुपयात पीक विमा योजना सुरू केलेली असताना या योजनेचे अर्ज भरण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) चालक शेतकऱ्यांकडे जास्तीच्या १००-१५० रुपयांची मागणी करत आहेत. हा प्रकार तातडीने थांबवावा. कांदा अनुदान व पीक विम्यासाठी शेतकऱ्यांना अजिबात वेठीस धरू नये, अशी आग्रही मागणी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी तहसीलदारांकडे केली. लोकप्रतिनिधींचा प्रशासकीय अधिकाऱ्यांवर अजिबात वचक नसल्याने शासकीय अधिकारी, कर्मचारी मनमानी करत असून, लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचा घणाघाती आरोपही विवेक कोल्हे यांनी यावेळी केला.  

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी युवा नेते विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सोमवारी (१० जुलै २०२३) कोपरगाव येथील तहसील कार्यालयात समस्या निवारण बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पाणी, रस्ते, वीज, स्मशानभूमी, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान, घरकुल, रेशनकार्ड ऑनलाईन करणे, समृध्दी महामार्गाच्या कामामुळे खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती, पाण्याचा निचरा, संजय गांधी निराधार योजनेचे प्रलंबित प्रस्ताव मंजूर करणे आदी अनेक महत्त्वाचे प्रश्न विवेक कोल्हे यांनी मांडले. तहसीलदार संदीप भोसले यांनी या प्रलंबित प्रश्नांवर लवकरात लवकर योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. प्रारंभी विवेक कोल्हे यांनी नूतन तहसीलदार संदीप भोसले यांचा सत्कार केला. 

या बैठकीस गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, तालुका भूमी अभिलेख विभागाचे भास्कर, महावितरणचे अभियंता किशोर घुमरे, कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शरदनाना थोरात, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक बापूसाहेब बारहाते, माजी पं. स. सभापती सुनील देवकर, कारवाडीचे मारूतीराव लोंढे, शिंगणापूरचे सरपंच डॉ. विजय काळे, धारणगावचे दीपक चौधरी, वेळापूरचे सरपंच सतीश बोरावके, देर्डे चांदवडचे डॉ. नानासाहेब होन, कैलासराव रहाणे, बाबासाहेब नेहे, कानिफ गुंजाळ, आनंद शिंदे,किसनराव पवार, राजेंद्र बढे, कचेश्वर माळी, अमोल गवळी, अनिल गवळी, सतीश केकाण, रामदास शिंदे, प्रभाकर शिंदे, अविनाश संवत्सरकर, प्रशांत आढाव, कैलास चांडे, प्रसाद आढाव, अमोल गवळी, अनिल गवळी, राजेंद्र बडे, अशोकराव गवारे, विजुकाका जामदार, मुकुंदमामा काळे, राजेद्र जामदार, विलास निकम, गोरख टुपके, ज्ञानेश्वर निकम, खोपडीचे सरपंच जयराम वारकर, सोपानराव देठे,

मारुती देठे, रामराव देठे, कचरु भाटे, मनोज थोरात, दत्तात्रय टुपके, अनिल भाकरे, सोपान भाकरे, पप्पू भाकरे, आबासाहेब भाकरे, उक्कडगावचे दादासाहेब निकम, दत्तात्रय निकम, सुरेश जाधव, कैलास माळी, राजकुमार दवंगे, शरदराव गडाख, गोरक्षनाथ गाडे, दादा कासार, नवनाथ सोनवणे, गोरख नाजगड, सतीश बोरावके,  रावसाहेब मोकळ, किरण उगले, मोहन जाधव, दादासाहेब सुंबे, दत्तात्रय घेगडमल, रामजी आसने, पोपट आसने, रवींद्र रांधवणे, सुभाष कानडे, भाऊसाहेब शिरसाट, मनोज तुपे, सुरेश शिंदे, शिवाजी देवकर, बाबासाहेब गायकवाड, विजय गीते, कपिल सुरळकर, अतुल सुरळकर, किशोर साळुंखे, भाऊसाहेब वाकचौरे, लक्ष्मण वाकचौरे, रवींद्र सोळसे, रंगनाथ भागवत, भाऊसाहेब सिरसाठ, सुरज मुसळे, गोरक्षनाथ टुपके आदींसह विविध विभागांचे अधिकारी, माजी जि. प. व पं. स. सदस्य, सरपंच, सोसायटीचे चेअरमन. विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी विवेक कोल्हे म्हणाले, कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या विविध प्रश्नांसाठी ९ मे २०२२ रोजी आम्ही तहसील कार्यालयावर विराट मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले होते. तेव्हापासून आम्ही जनतेचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी दर महिन्याला तहसील कार्यालयात समस्या निवारण बैठक आयोजित करून पाठपुरावा करत आहोत. तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी जनता दरबार, समन्वय समितीची नियमित बैठक घेऊन जनतेचे प्रश्न सोडविणे अपेक्षित आहे; पण दुर्दैवाने आज तसे होताना दिसत नाही. लोकप्रतिनिधींचा प्रशासकीय अधिकाऱ्यांवर अजिबात वचक नाही. शासकीय अधिकारी, कर्मचारी मनमानी करत असून, लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे जनतेचे अनेक छोटे-छोटे प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे व मी जनहिताचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करत असून, आजवर विकासाचे अनेक प्रश्न आम्ही मार्गी लावले आहेत. आजच्या बैठकीत मांडलेले प्रश्न त्वरित सुटले नाहीत तर आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

पंतप्रधान नरेंद मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी पंतप्रधान पीक विमा योजना सुरू केलेली असून, आता राज्‍य शासनाने सुरू केलेली एक रुपयात पीक विमा योजना ही महत्त्वाकांक्षी योजना शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे‌. आता शासनच शेतकऱ्यांच्या पीक विम्‍याची रक्‍कम भरणार असून, या योजनेचा कोणताही आर्थिक भार शेतकऱ्यांवर पडणार नाही. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे १ रुपयात पीक विमा होणे गरजेचे असतानाही कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) चालक शेतकऱ्यांकडे जास्तीचे पैसे मागत आहेत. शिंदे- फडणवीस सरकारने शेतक-यांना कांदा विक्रीपोटी अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यासाठी सातबारा उताऱ्यावर खरीप कांदा पीक अशी नोंद आवश्यक होती; परंतु बहुतांश शेतकऱ्यांकडून उन्हाळ रब्बी कांदा अशी नोंद झालेली आहे.

कोपरगाव तालक्यातील अनेक शेतकऱ्यांचे कांदा अनुदानासाठीचे प्रस्ताव अपात्र ठरवले आहेत. शासनाने कसलीही अट न लावता त्रिसदस्यीय समितीचा कांदा नोंद असल्याचा दाखला ग्राह्य धरावा आणि कांदा अनुदानास अपात्र ठरवलेल्या शेतकऱ्यांना पात्र ठरवून त्यांचे प्रस्ताव मंजूर करावेत. कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव व सुरेगाव या दोन सर्कलमधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली आहे; परंतु रवंदे, कोपरगाव, दहेगाव बोलका व कोकमठाण या सर्कलमधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाची आर्थिक मदत अद्याप मिळाली नसून ती त्वरित देण्यात यावी, अशी मागणी विवेक कोल्हे यांनी केली.

संजय गांधी निराधार योजनेच्या ४४८ लाभधारकांचे प्रलंबित प्रस्ताव तात्काळ मंजूर करावेत, घारी व डाऊच (बु.) गावासाठी स्वतंत्र तलाठी सज्जाची त्वरित निर्मिती करावी, धोंडेवाडी गावासाठी नवीन गावठाण विस्तार करावा, समृध्दी महामार्गाच्या कामामुळे कोकमठाण, कान्हेगाव, देर्डे कोऱ्हाळे व इतर अनेक भागातील खराब झालेले रस्ते दुरुस्त करावेत म्हणून एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांकडे यापूर्वी वारंवार पाठपुरावा करूनही रस्त्यांची दुरुस्ती झालेली नाही. संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावून हा प्रश्न त्वरित मार्गी लावावा, कान्हेगाव येथील ११ मेन पोटचारी समृध्दी महामार्गाच्या कामामुळे बुजली आहे. सन २०१८ पासून पाठपुरावा करीत असूनदेखील चारीचे काम होत नाही. ते काम तातडीने करावे, कान्हेगाव, भाकरे वस्ती व इतर ठिकाणी समृध्दी महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली व भुयारी मार्गात पाणी साठल्याने रहदारीस रस्ता बंद पडलेला असून, याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करावी.

समृध्दी महामार्गामुळे ग्रामीण मार्ग क्र.५२९ व ५३१ ची दुरवस्था झाल्याने सदर रस्त्याचे त्वरित काम करावे, समृध्दी महामार्गावरील पावसाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन उभ्या पिकांचे मोठे नुकसान होत असल्याने रस्त्यालगत साईड गटार काढून पाणी निचऱ्याची व्यवस्था करावी, भोजडे चौकी, बोलकी व अंचलगाव येथील रेल्वेमार्गाच्या खालील बोगद्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे या भुयारी मार्गातील पावसाचे पाणी काढावे, धारणगाव, जेऊर पाटोदा, मुर्शतपूर, चांदगव्हाण व हिंगणी या पाच गावांसाठी मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनच्या कामामुळे रहदारीचे रस्ते खराब झाले आहेत ते तातडीने दुरूस्त करावेत, संवत्सर शिवारातील भाकरे वस्ती ते कासली रोड येथे जलजीवन मिशनअंतर्गत चालू असलेल्या पाईपलाईनच्या खोदकामामुळे रस्त्यावर चिखल होत असून, वाहने घसरून अपघात होत आहेत.

तसेच शालेय विद्यार्थ्यांची जाण्या-येण्यासाठी गैरसोय होत आहे तेव्हा तातडीने मुरूम टाकून रस्ता तयार करून द्यावा, पुणतांबा रोड ते चांदखन बाबा रस्त्याचे तात्काळ खडीकरण करावे, वेळापूर येथे साठवण तलावासाठी ग.नं.२१६ (गायरान क्षेत्रातील) तर स्मशानभूमीसाठी ग.नं. १३७ (जुने गावठाण) क्षेत्रातील जागा उपलब्ध करून द्यावी, घारी-चांदेकसारे येथील पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंर्तगत रस्त्यावरील पुलाची दुरूस्ती करावी, गोधेगाव, ब्राम्हणगाव व चांदगव्हाण येथे बिबट्याचा वावर वाढल्याने स्थानिक पातळीवर पिंजरा उपलब्ध करून देऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा.

धोंडेवाडी येथील नेहे वस्ती गावठाण भागात त्वरित डीपी बसवावी, वेस येथे गावठाण हद्दीतील डीपीवर ओव्हरलोड असल्याने वारंवार वीजपुरवठा खंडीत होत असल्याने नवीन जास्त क्षमतेचा डीपी बसवावा, चांदगव्हाण येथे माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या कार्यकाळात मंजूर झालेली डीपी त्वरित बसवावी, शिंगणापूर, चांदगव्हाण-आव्हाड वस्ती ते सानपवस्ती येथील नागरिकांना सिंगल फेज वीजपुरवठा व्हावा, देर्डे चांदवड येथे आदिवासी वस्तीत नवीन वीज कनेक्शन तातडीने द्यावे आदी मागण्या विवेक कोल्हे यांनी यावेळी मांडल्या.