राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)  प्रदेश सरचिटणीस पदी शिवाजीराव गर्जे

Mypage

अहमदनगर प्रतीनिधी, दि. १० :  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( अजित पवार गटाच्या )  प्रदेश सरचिटणीस पदी अहमदनगर जिल्ह्याचे सुपुत्र शिवाजीराव गर्जे यांची पुन्हा एकदा निवड झाली आहे.  प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी महाराष्ट्रात एकमेव सरचिटणीस म्हणून गर्जे यांची निवड केली आहे.

Mypage

उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ना. छगन भुजबळ यांनी गर्जे यांना निवडीचे पत्र दिले. गेली बावीस वर्ष प्रदेश सरचिटणीस म्हणून गर्जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाचा कारभार सांभाळत आहेत. प्रशासन, संघटना, निवडणुका, फंटल व सेलचा कारभार त्यांनी समर्थपणे सांभाळला. अजित पवारांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी काम केले.

Mypage

अजितदादा डायनॅमिक नेतृत्व आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे व तरुण पिढीचे भविष्य उज्वल आहे. त्यांची कार्यक्षमता अफाट आहे. राज्याला प्रगतीपथावर नेण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नव्या पिढीचे नेतृत्व अजितदादाच करू शकतात यामुळे गर्जे यांनी अजित पवारांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. यापुढील काळात अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत सर्व समाज घटकातील तरुणांना संधी उपलब्ध होणार असल्याचे गर्जे म्हणाले.

Mypage