शिर्डी प्रतिनिधी, दि. १ : नववर्षानिमित्त बुधवारी मूळचे जम्मू काश्मीर येथील रहिवासी असलेले व सध्या शिर्डी येथील वास्तव्य करणारे साईभक्त बबीत टींकू यांनी १३ लाख किमतीचा सोन्याचा हार साईचरणी अर्पण केला आहे.
श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भक्तांची श्रद्धा आहे. याच श्रद्धेपोटी भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देतात. नववर्षाच्या निमित्ताने जम्मु काश्मिर व सध्या शिर्डी येथील रहिवाशी असलेले साईभक्त श्रीमती बबीता टिकू यांनी श्री साईचरणी २०६ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सोन्याचा हार अर्पण केला आहे.
या सोन्याच्या हाराची किंमत १३ लाख ३० हजार असून हा सुंदर नक्षिकाम असलेला हार साईबाबांच्या चरणी अर्पण करुन श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. श्री साईबाबा संस्थानच्या वतीने देणगीदार साईभक्तांचा शाल व श्री साईबाबांची मुर्ती देवून सत्कार केला. यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहीदास माळी आदी उपस्थित होते.