गो-रक्षकावर कत्तलखाना चालकांनी केला हल्ला

शेवगाव प्रतिनिधी, दि.१३ :  तालुक्यातील अमरापुर येथे गोरक्षकावर कत्तलखाना चालकांनी केलेल्या हल्यात एक गोरक्षक जबर जखमी झाला असुन त्यास उपचारार्थ नगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्यात दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली. याबाबत परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी कि, अमरापुर येथे गाईंची कत्तल होत असल्याची माहिती मिळाल्याने हिंदुत्ववादी संघटनेचे पाच सहा गोरक्षक कार्यकर्ते गोहत्या रोखण्यासाठी अमरापुर येथे आले असता तेथे त्यांच्यावर कत्तलखाना चालविणाऱ्या जमावाने हल्ला केला. या हल्यात रवि गायकवाड यास लोखंडी रॉड, लोखंडी सत्तुरने मारहाण करण्यात आली. यात तो जबर जखमी झाला असुन त्यास नगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जमावाने गोरक्षकांच्या दुचाकी वाहनांची तोडतोफ केली.

सोमवारी सांयकाळी ९.३० ते १० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली घटनेची माहिती मिळताच अनेक हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते अमरापुर येथे दाखल झाले होते. यावेळी शेवगाव, पाथर्डीसह अन्य ठिकाणाचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दुसऱ्या दिवशीही पोलिसांनी अमरापुरला ठाण मांडले होते.

याबाबत मुस्लीम समाजाच्या एका महिलेने मंगळवार दि.१२ रोजी दिलेल्या फिर्यादीवरुण रवि गायकवाड व इतर ५ ते ६ जणांविरुद्ध विनयभंग, चोरी अशा विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान जखमी रवि गायकवाड याने मंगळवारी रात्री उशीरा दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, कुरेशी मोहल्यात सहा गायी जिवंत व एकाची कत्तल केलेली होती.

मी तेथे गेलो असता तुम्ही कोण ईथे कशाला आलात अशी मला विचारणा झाली त्यावर आम्ही म्हणालो गाय आमची माता आहे. तिची कत्तल करू नका तो कायद्याने गुन्हा आहे. याचा राग आल्याने लोखंडी रॉड व सत्तुर याने मला व माझा मित्र महेश आसाराम जेधे यास मारहाण करू लागले. यातुन जेधे पळाला मात्र, मला पकडून रॉड, सत्तुरने जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

तसेच दहा तोळे सोन्याची चैन व मोबाईल हिसकावून घेतले आहेत. यावरुण राजु कुरेशी, अल्ताफ कुरेशी, काल्या कुरेशी, अल्तमश कुरेशी सर्व राहणार अमरापुर यांच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.