स्व. शंकरराव कोल्हे यांचे कार्य अमर आहे – सुमित कोल्हे

स्व. शंकरराव  कोल्हे यांच्या द्वीतिय पुण्य स्मरणाच्या मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीर

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १७ : माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी अनेक सहकारी संस्था स्थापन करून लाखोंचे पोशिंदे बनले. गोरगरीबांना वैद्यकिय सेवा मिळावी, म्हणुन त्यांच्या संकल्पनेतुन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी आयुर्वेदा कॉलेजची मागील वर्षी स्थापना करण्यात आली.

त्यांच्या नावाने सुरू केलेला फिरता दवाखाना महिन्याकाठी सुमारे ३००० रूग्नांना मोफत सेवा देवुन औषधोपचार करीत आहे. आयुष्यभर त्यांनी समाजीतील सर्व स्थरातील जनतेसाठी जनसेवेचे कार्य केले असुन त्यांचे कार्य पुढे नेटाने नेत राहणे, हीच त्यांना खरी आदरांजली आहे. त्यांच्या कार्याने ते अमर आहे, असे प्रतिपादन संजीवनी ग्रुप ऑफ इत्सियुट्सचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी केले.

संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक, माजी मंत्री स्व. शंकरराव  कोल्हे यांच्या द्वीतिय पुण्य स्मरणाच्या निमित्ताने कोपरगांव येथे संजीवनी आयुर्वेदा कॉलेजच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीर  भरविण्यात आले होते. सदर शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी कोल्हे बोलत होते. सर्व प्रथम उपस्थितांनी स्व. कोल्हे यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन केले. यावेळी कार्यकर्ते विजय आढाव, कॉलेजचे प्राचार्य डॉ. राम पवार, डायरेक्टर डी. एन. सांगळे, वैद्यकिय अधिकारी, प्रतिष्ठित  नागरीक व रूग्न उपस्थित होते.

सुमित कोल्हे पुढे म्हणाले की, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्षनितीनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली  आरोग्य सेवेचे हे व्रत असेच चालु असणार आहे. स्व. कोल्हे यांचे आयुर्वेदावर दृढ विश्वास होता. म्हणुनच त्यांनी कोरपड खाण्याची सवय साधारण १९९० पासुन अंगीकारली. ज्या ज्या वेळी जेथे जेथे संकटे आली तेथे स्व. कोल्हे हे संकटांचे निराकरण करण्यासाठी पुढे असायचे.

व्यायाम आणि कामावर त्यांचे निस्सिम प्रेम होते. जे त्यांच्या सपर्कात आले, त्यांच्यासाठी ते आजही प्रेरणा स्त्रोत म्हणुन कार्यरत आहे. त्यांच्याच शिकवणीने संपुर्ण कोल्हे कुटूंबिय समाजासाठी कार्यरत असल्याचे सुमित कोल्हे यांनी शेवटी म्हटले. दिवसभर चाललेल्या शिबिरात अनेक गरजुंनी आरोग्य तपासणी करून औषधोपचार घेतले. प्रशासकीय अधिकारी मुकुंदा भोर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.