कुणबी मराठा महासंघाच्या तालुका अध्यक्षपदी गोरक्षनाथ राशिनकर

कोपरगाव प्रतिनिधी दि.१८ : महाराष्ट्र राज्यस्तरावर स्थापन झालेल्या अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघाच्या अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यातील उत्तर नगर व दक्षिण नगर या भागातील १४ तालुक्यांच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्तीचा कार्यक्रम दि.१० रोजी उत्साहात पार पाडला. कुणबी मराठा महासंघाच्या तालुका अध्यक्षपदी गोरक्षनाथ राशिनकर पाटील यांची नियुक्ती. सदर कार्यक्रमासाठी अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ समाजाचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद पाटील अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष अनिल भाऊ ताके पाटील महिला अध्यक्ष नीताताई हासे पाटील उपस्थित होत्या.

यावेळी कोपरगाव तालुक्याचे अध्यक्ष कार्याध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामध्ये कोपरगाव तालुका कुणबी मराठा महासंघ तालुका अध्यक्षपदी गोरक्षनाथ राशिनकर पाटील यांची तर कार्याध्यक्ष पदी प्रदीप लोखंडे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्तीचे पत्र त्यांना नेवासा येथे पार पाडलेल्या कार्यक्रमांमध्ये देण्यात आले व त्याचा राज्य व जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते नियुक्तीपत्र पुष्पगुच्छ व शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

पुढील मासिक कालावधी मध्ये कोपरगाव तालुका व शहर कार्यकारीणी संघटित करून मराठा कुणबी समाजाचे समस्या दाखले मिळण्यासाठी जिल्हापरिषद गट, पंचायत समिती गट, निहाय व महसूल मंडळ, निहाय महसूल विभाग, शासन अधिकारी यांचे द्वारे शिबिराचे आयोजन करण्यात येऊन समाजातील युवक, युवती, बेरोजगार युद्ध, अपंग व कृषी आधारीत व्यावसायिक यांना विविध सवलती योजना मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. व लवकरात तालुक्यातील कुणबी मराठा समाजातील क्रियाशील पुरुष, युवक, महिला युवती यांचा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.