कोपरगाव प्रतिनिधी, दि.२० : तालुक्यातील वेळापुर येथील श्री गणेश, शिवपार्वती, नंदी, हनुमान, राधाकृष्ण, विठठल रूक्मीणी, विश्वकर्मा, वरूण देव, माता गोदावरी, अग्नीदेव, ज्ञानेश्वर माउली, शनैश्वर देवता मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळयानिमीत्त २१ ते २७ मार्च पर्यंत हरिनाम किर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यांत आले आहे. नामजप सुरेगांव येथील हभप गोवर्धनगिरी महाराज यांच्या हस्ते मार्गदर्शनाखाली सुरू होईल.
२१ मार्च रोजी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी आश्रमाचे मठाधिपती रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते ध्वज व कलशपुजन तर राघवेश्वर आश्रमाचे प. पू. राघवेश्वरानंदगिरी महाराज यांच्या हस्ते विनापूजन होईल.
हभप ज्ञानेश्वर महाराज सुडके (२१ मार्च), महंत गुरूवर्य हरिशरणगिरीजी महाराज (२२ मार्च), हभप मारूती महाराज शिर्के (२३ मार्च), हभप काशिनाथ महाराज मोरे (२४ मार्च), हभप महंत प्रकाशानंदगिरीजी महाराज (२५ मार्च), हभप सदगीर महाराज (२६ मार्च), हभप देविदास महाराज म्हस्के (२७ मार्च), यांचे दररोज सायंकाळी ७ ते ९ किर्तन होईल. २७ मार्च रोजी सकाळी ९ वाजता महामंडलेश्वर दत्तात्रेयरत्न शिवस्वरूप स्वामी शिवानंदगिरी महाराज मंजुर यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा संपन्न होईल.
२८ मार्च रोजी सकाळी १० वाजता हभप निवृत्ती महाराज चव्हाण यांच्या काल्याच्या किर्तनांने सदर सोहळयाची सांगता होवुन महाप्रसाद वाटप करण्यांत येणार आहे तरी जास्तीत जास्त भाविकांनी या सोहळयासाठी उपस्थित रहावे असे आवाहन वेळापूर पंचक्रोशीयवासियांनी केले आहे.