संजय कोळगे यांची राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती

शेवगाव प्रतिनिधी, दि २१: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी शेवगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे यांची मान्यवराच्या उपस्थितीत नुकतीच  नियुक्ती करण्यात आली आहे.

        उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोळगे यांना मुंबई येथे नियुक्तीपत्र देण्यात आले. कोळगे हे तालुक्यातील आव्हाने बुद्रुक येथील रहिवासी असून राष्ट्रवादी युवक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून गेली अनेक वर्ष ते कार्यरत राहिले आहेत. आता अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार चंद्रशेखर घुले, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र नागवडे,  नूतन जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा, माजी जिल्हाध्यक्ष तथा नूतन प्रदेश चिटणीस प्रशांत गायकवाड आदींची उपस्थिती होती.

कोळगे माजी आमदार घुले बंधूचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नियुक्तीचे तालुक्यासह जिल्ह्यातून स्वागत होत असून कोळगे यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार गट राष्ट्रवादी पक्षाची बांधणी करण्यात त्यांना निश्चीत यश येईल असा विश्वास अनेकजण व्यक्त करत आहेत.