स्व. कोल्हे साहेबांनी जपलेला विश्वास टिकवण्यासाठी तिसरी पिढी कार्यरत – स्नेहलताताई कोल्हे

स्व. शंकरराव कोल्हे साहेबांच्या जयंती निमीत्त विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रम 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ : सहकार महर्षी स्व. शंकरराव कोल्हे साहेब यांनी सहकार, शिक्षण, शेती, पाटपाणी आदी क्षेत्रात उल्लेखणीय कार्य करत समाज्याचा सर्वांगीण विकास केला आहे. त्यातून साहेबांनी मनामनात जनतेचा विश्वास म्हणून जी संपत्ती जपली आहे. त्या विचारासाठी तिसरी पिढी कार्यरत असल्याचा विश्वास कोपरगाव मतदार संघाच्या प्रथम आमदार सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी व्यक्त केला.

  रविवारी रोजी (दि.२४) अष्टविनायक मंडळाच्या आयोजित माजी मंत्री शंकरराव कोल्हे साहेब यांच्या जयंती अभिवादन कार्यक्रमात बोलत होत्या. तसेच मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या संपर्क कार्यालयात अभिवादन करण्यात आले.

 सहकार महर्षी माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांच्या रविवारी ठिकठिकाणी कोपरगाव मतदार संघात जयंती निमीत्ताने अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शहरातील संपर्क कार्यालयात ही अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला होता. 

पुढे प्रथम आमदार सौ.स्नेहलताताई म्हणाल्या की, कोल्हे साहेबांचा ध्यास हा केवळ आणि केवळ समाज्याच्या विकासासाठी होता. त्यासाठी त्यांनी नेहमी तळमळ असायची. समाज्यातील प्रत्येक घटक हा प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशिल होते. आणि या कार्यातून त्यांनी जो।जनतेचा विश्वास संपादन केला होता. त्यांची तिसरी पिढी जपण्याचा प्रयत्न करत आहे, असे मार्गदर्शन करीत प्रथम महिला आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांना अभिवादन करीत केले. 

या प्रसंगी अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान, शहराध्यक्ष डी.आर.काले, युवा मोर्चा शहराध्यक्ष द्धार्थ साठे, दिलीपराव दारूणकर, बबलू वाणी, संजय सातभाई, कैलास जाधव, विजय भडकवाडे, अतुल काले, जितेंद्र रणशूर, आर.डी. सोनवणे, बाळासाहेब आढाव, विनोद राक्षे, वैभव गिरमे, संतोष साबळे, संदीप देवकर, दीपक जपे, बाळू पवार,गोपी गायकवाड, प्रमोद नरोडे, संजय जगदाळे, कैलास खैरे, पप्पू पडियार, सुभाष पाटणकर, अशोक लकारे, रंजन जाधव, अरुण उदावंत, सुभाष परदेशी, महेश खडामकर, राजेंद्र बागुल,प्रसाद आढाव, रोहित कणगरे, सतीश रानोडे, किरण सूर्यवंशी, राजेंद्र गंगूले, सुखदेव जाधव, जयप्रकाश आव्हाड, रविंद्र लथुरे, सचिन सावंत, खलीलभाई कुरेशी, इलियास शेख, शफिक सय्यद, फकीर महंमद पैलवान, मुख्तार शेख, संदीप निरभवने, संजय खरोटे आदीसह मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.