कर्मवीर शंकरराव काळे साहेबांना मान्यवरांकडून अभिवादन

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०७ : – कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे याहीवर्षी कोसाका उद्योग समुहाचे संस्थापक शिक्षण महर्षी माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे यांची १०३ वी जयंती कारखाना कार्यस्थळावरील कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यान गौतमनगर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी कर्मवीर शंकररावजी काळे यांना अभिवादन करण्यासाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना, उद्योग समूह व सर्व सलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा.चेअरमन, पदाधिकारी, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

याप्रसंगी माजी आमदार अशोक काळे, गौतम बँकेच्या माजी संचालिका पुष्पाताई काळे, आ. आशुतोष काळे, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे, कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण, उपाध्यक्ष नारायण मांजरे, अॅड. प्रमोद जगताप, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन डॉ. मच्छिंद्र बर्डे, सर्व संचालक मंडळ, गौतम बँकेचे माजी चेअरमन बाबासाहेब कोते, संचालक सिकंदर पटेल, 

कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असि. सेक्रेटरी संतोष शिरसाठ, माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाळा-महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहावर प्रेम करणारे हितचिंतक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच कोपरगाव शहरातील पंचायत समितीच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास देखील आ. आशुतोष काळे यांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले यावेळी मा.जी.प.सदस्य राजेश परजणे,राजेश ठोळे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, डॉ. अजय गर्जे,  संजय भन्साळी, प्रेम भंडारी, गौतम बँक संचालक दत्तात्रय खेमनर, मुन्ना सय्यद, आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.