कोल्हे परिवाराचे ऋण मुस्लिम समाज कधीही विसरणार नाही

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ६ : संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष तथा सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ मार्गदर्शक बिपीनदादा शंकररावजी कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहरातील मौलाना मुनीर अहमद उर्दू प्राथमिक विद्यालय व हायस्कूलमधील गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना मंगळवारी (४ जुलै) मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हेसाहेब तसेच बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी मुस्लिम समाजाला नेहमीच संकटकाळात मदत करून त्यांचे विविध प्रश्न सोडवून न्याय दिला आहे. मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सदैव सहकार्य केले आहे. मुस्लिम समाज कोल्हे परिवाराचे हे ऋण कदापिही विसरणार नाही, अशा भावना रियाज शेख, शफिकभाई सय्यद, अकबरभाई शेख यांनी यावेळी व्यक्त केल्या.

Mypage

संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी आपल्या वाढदिवसाला होणारा अनावश्यक खर्च टाळून त्यातून विद्यार्थ्यांना मोफत वह्या व शैक्षणिक साहित्यांचे वाटपासारखे उपक्रम राबविण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. त्यानुसार मागील २०-२२ वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून, मंगळवारी (४ जुलै) शहरातील मौलाना मुनीर अहमद उर्दू प्राथमिक विद्यालय व हायस्कूलमधील गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनोद राक्षे होते. याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष डी. आर. काले, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, भाजयुमोचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे संचालक गोपीनाथ गायकवाड, माजी नगरसेवक अल्ताफभाई कुरेशी, संजीवनी पतसंस्थेचे संचालक राजेंद्र बागुल, इलियासभाई शेख, शफिकभाई सय्यद, एस. पी. पठाण, हाशमभाई पटेल,

Mypage

रहीमभाई शेख, भाजप किसान मोर्चाचे शहराध्यक्ष सतीश रानोडे, प्रमोद नरोडे, संतोष साबळे, सचिन सावंत, चंद्रकांत वाघमारे, अकिश बागवान, सादिक पठाण, मौलाना मुनीर अहमद उर्दू हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक रियाज शेख, अकबरभाई शेख,   अहमदभाई शेख, मुख्याध्यापिका महेबीन रफिकभाई शेख, शिक्षक इलियास इब्राहिम शेख, अबरार जुबेर पठाण, मकसूद अहमद शेख, अयुब खान, मुख्तार शेख, श्रीमती शबाना सलीम सय्यद, फरहाद असलम शेख, आशिया इब्राहिम शेख यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी, भाजपचे पदाधिकारी, माजी नगरसेवक व  मुस्लिम समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Mypage

सेवानिवृत्त मुख्याध्यापक रियाज शेख यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. स्वागतपर भाषणात रियाज शेख म्हणाले, माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकररावजी कोल्हेसाहेब यांनी आयुष्यभर सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन समाजकारण व राजकारण केले. सर्वसामान्य माणसांच्या हिताला व विकासाला प्राधान्य देत कोपरगाव शहराचा व तालुक्याचा कायापालट घडवला. मुस्लिम समाजाचे विकासाचे विविध प्रश्न सोडवितानाच त्यांना अडचणीच्या काळात सतत मदत केली.

Mypage

स्व. शंकरराव कोल्हेसाहेब, बिपीनदादा कोल्हे व स्नेहलताताई कोल्हे यांनी मुस्लिम समाजातील तरुण पिढी शिक्षण घेऊन प्रगत व्हावी म्हणून  मौलाना मुनीर उर्दू शाळा व इतर शाळांना खूप मदत केली. आजही कोल्हे कुटुंबीय मुस्लिम समाजाच्या मदतीला नेहमीच धावून येते. बिपीनदादा कोल्हे यांचे कर्तृत्व उत्तुंग आहे. समाजाचे आपण काही तरी देणे लागतो, या भावनेतून ते दरवर्षी आपल्या वाढदिवसाला गरजू व गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्या व अन्य शैक्षणिक साहित्यांचे वाटप करतात. त्यांचा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.    

Mypage

शफिकभाई सय्यद म्हणाले, मुस्लिम समाजबांधवांचे स्व. शंकरराव कोल्हेसाहेबांवर विशेष प्रेम होते. स्व. कोल्हेसाहेबांनी आमदार, मंत्री असताना मुस्लिम समाजाचे विविध प्रश्न सोडवून त्यांना न्याय दिला. मुस्लिम समाजबांधवांच्या सुख-दु:खात नेहमी सहभागी होणाऱ्या कोल्हे परिवाराने कोपरगाव शहरातील व संपूर्ण विधानसभा मतदारसंघातील मुस्लिम समाजाच्या प्रगतीसाठी खूप मोठे काम केले आहे. सर्वधर्मसमभाव जोपासणाऱ्या कोल्हे परिवारामुळे कोपरगावात सामाजिक एकता व जातीय सलोखा कायम आहे. कोल्हे कुटुंबीय मुस्लिम समाजाच्या पाठीशी कायम उभे असते. त्यामुळे आम्हाला मोठा आधार वाटतो, असे शफिकभाई यांनी सांगितले. 

Mypage

राजेंद्र सोनवणे म्हणाले, स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांचा जनसेवेचा वसा कोल्हे परिवार आजही समर्थपणे पुढे चालवत आहे. बिपीनदादा कोल्हे हे विकासाची दूरदृष्टी असलेले उत्तुंग व्यक्तिमत्त्व आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ते दरवर्षी आपला वाढदिवस कोपरगाव मतदारसंघातील गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करून साजरा करतात. कार्यकर्त्यांनाही त्यांनी हीच शिकवण दिली आहे. मौलाना मुनीर उर्दू शाळा सुरू करण्यात त्यांचे मोठे योगदान राहिलेले असून, या ठिकाणी ११ वी व १२ वीचे वर्ग सुरू होण्यासाठी बिपीनदादा कोल्हे, स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांच्या माध्यमातून नक्की प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. डी. आर. काले यांनी कोल्हे कुटुंबीय समाजसेवेत नेहमी अग्रेसर असल्याचे सांगून मौलाना मुनीर उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन समाजाचा व कोपरगावचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन केले. 

Mypage

विनोद राक्षे म्हणाले, मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी, या समाजातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी स्व. शंकरराव कोल्हेसाहेब, बिपीनदादा कोल्हे व स्नेहलताताई कोल्हे यांनी भरीव योगदान दिले आहे. स्नेहलताताई कोल्हे यांनी कोपरगाव शहरासह मतदारसंघातील विविध ठिकाणी मस्जिद, कब्रस्तान, मदरसे, उर्दू शाळेच्या इमारतींसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. तसेच मुस्लिम समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. मौलाना मुनीर उर्दू शाळेतील शेड बांधण्यासाठी बिपीनदादांनी निधी मिळवून दिला. युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी शहरातील उर्दू शाळेतील विविध प्रश्न सोडविण्यासाठी मोठी मदत केली आहे.

Mypage

बिपीनदादा कोल्हे यांच्यासह संपूर्ण कोल्हे कुटुंबीय सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी नेहमीच झोकून देऊन काम करत असल्याने जनता त्यांच्या पाठीशी उभी आहे. बिपीनदादा कोल्हे हे युवा पिढीचे प्रेरणास्थान असून, बिपीनदादांच्या सामाजिक कार्याचा आदर्श इतरांनी घेतला पाहिजे. यावेळी अकबरभाई शेख यांनी आपल्या भाषणात कोल्हे कुटुंबाने मुस्लिम समाजाचे विविध प्रश्न सोडवून त्यांच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान दिले असल्याचे गौरवोद्गार काढले. सूत्रसंचालन शेख इलियास यांनी केले.