शेवगाव लोकसभा मतदान यंत्रणा झाली सज्ज

शेवगाव प्रतिनिधी, दि.०७ :  लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी २२२ शेवगाव विधान सभा मतदार संघाची शेवगाव तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाची यंत्रणा सज्ज झाली असून येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या शेवगाव पाथर्डी तालुक्यातील मतदान अधिकारी व कर्मचाऱ्या साठी रविवार (दि.७) व सोमवार (दि.८) असे दोन दिवसीय पहिले प्रशिक्षण आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रान्ताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी दिली.

२२२ शेवगाव पाथर्डी विधान सभा मतदार संघात एकूण ३६५ मतादान केंद्र आहेत. त्यात शेवगाव तालुक्यातील १९४ तर पाथर्डी तालुक्यातील १७१ मतदान केंद्राचा समावेश आहे. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी ३६५ केंद्राध्यक्ष, ७३० मतदान अधिकारी, ३६५ महिला मतदान अधिकारी,३६५ शिपायी व राखीव असे एकूण २०४० अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. एकूण मतदाराची संख्या तीन लाख ५६ हजार ४७७ असून त्यात एक लाख ८७ हजार ३४ पुरुष व एक लाख ६९ हजार ४४१ महिला व २ इतर मतदारां चा समावेश आहे.

निवडणुकीबाबतचे सर्व प्रकारचे परवाने एकाच ठिकाणी मिळण्यासाठी एक खिडकी स्वतंत्र कक्षाची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. आदर्श आचार संहिता आंमल बजावणी साठी सहा भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. निवडणूक कर्मचाऱ्यासाठी रविवारी व सोमवारी येथील नेवासे रस्त्यावरील त्रीमुर्ती शैक्षणिक संकुलामध्ये पार पडणाऱ्य पाहिल्या प्रशिक्षणाचा उपक्रमात मतदान प्रक्रिया कशी पार पाडावी, नियमावली काय आहे, रेकॉर्ड कसे ठेवायचे, तसेच ईव्हीएम मशीन प्रात्यक्षिक व्हिडीओ द्वारे माहिती देण्यात येणार आहे.

नियुक्त कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणासाठी उपस्थित राहणे बंधन कारक करण्यात आले आहे. या प्रशिक्षण शिरबारात प्रान्ताधिकारी मते, तहसीलदार सांगडे, अप्पर तहसीलदार राहूल गुरव, नायब तहसीलदार रविंद्र सानप, निवडणूक नायब तहसीलदार राजेंद्र बकरे तसेच संगणक तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.