आरोपीकडून तीन चोरीच्या मोटरसायकली जप्त

शेवगाव प्रतिनिधी, दि.०७ :  नुकत्याच पार पडलेल्या चैतन्य कानिफनाथ मढी यात्रेतून चोरीस गेलेल्या दूचाकी वाहना पैकी काही वाहने तालुक्यातील शहरटाकळी येथे आल्याची माहिती मिळाल्याने पो.नि. दिगंबर भदाने यांनी तपास पथक तयार करून छापा घालून संशयित आरोपी वैभव लक्ष्मण हिवाळे (वय२२ रा .शहर टाकळी) यास ताब्यात घेण्यात आले असून त्याचे कडून तीन मोटार सायकली ताब्यात घेतल्या आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, मढी यात्रेतून काही दुचाकी वाहने चोरीस गेल्याच्या घटना घडल्याबाबत पाथर्डी व सोनई पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शेवगाव पोलिस पथकाने मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून शहरटाकळी येथील संशयित आरोपी हिवाळे याचे कडून दोन हिरो स्प्लेंडर व एक एचएफ डिलक्स अशा तीन मोटर सायकली ताब्यात घेतल्या आहेत. पुढील तपास पाथर्डी व सोनई पोलिस करत आहेत.