शेवगावात ईद मोठ्या उत्साहात साजरी

शेवगाव प्रतिनिधी, दि. ११ : शेवगाव शहरासह तालुक्यात मुस्लिम धर्मियांची पवित्र ईद उल फित्र ( रमजान ईद ) गुरुवारी  मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त शेवगावातील पाथर्डी रस्त्यावरील आय टी आय जवळील ईदगाह मैदानावर मौलाना आबेद हाफिज साहब यांनी हजारो मुस्लिम बांधवांचे उपस्थितीत सामूहिक नमाज पठण केली. यावेळी आबेद हाफिज साहब यांनी देशात सुख-समृद्धी शांती लाभो तसेच सध्याच्या दुष्काळजण्य परिस्थितीवर मात करण्याची शक्ती जनतेला द्यावी अशी प्रार्थना केली.

 सकाळी आठ वाजल्यापासून शहरतील जून्या इदगाह मैदानवर हाफिज मुक्तार मौलाना यांनी, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मरकस मशिदीत ताहेर अलिम साहब मौलाना यांनी सामुहिक नमाज पठण केली . या शिवाय पेठेतील जामा मशिदीत, नेवासे रस्त्यावरील तकिया मशिदीत ही सामुतिक नमाज पठण झाले. आज  गुरुवारी दिवसभर शेवगाव शहरात हिंदू – मुस्लिम बांधवांनी एकमेकांना अलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.  हिंदू बांधवांसाठी मुस्लिम मित्र परिवाराने शीरखुर्मा पिण्यासाठी पाचारण करून आनंद लुटला.

          यावेळी माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, माजी सभापती अरुण पाटील लांडे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश चिटणीस ॲड. प्रताप  ढाकणे, जनशक्ती विकास आघाडीचे ॲड शिवाजीराव काकडे व माजी जी.प. सदस्या हर्षदा  काकडे, वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष  प्रा. किसन चव्हाण, तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख,  राष्ट्रवादी शरदश्चंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष हरिष भारदे, राहूल मगरे, एजाज काझी, सेवादल जिल्हाध्यक्ष विनोद साळवे, उपाध्यक्ष राहूल वरे, सचिन गवारे, शिवसेना (शिंदे गट ) युवा सेना चे जिल्हाध्यक्ष साईनाथ आधाट, शिवसेना तालुकाध्यक्ष  आशुतोष डहाळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे, यांनी रमजान ईद निमित्त नमाज स्थळी  व शहरातील मुस्लिम भागात भेट देऊन शुभेच्छा दिल्या. शेवगाव पोलिसानी इदगाह मैदानावर मुस्लिम बांधवाना गुलाब पुष्प देऊन इदच्या शुभेच्छा दिल्या. याशिवाय ताकुक्यातील बोधेगाव, बालम टाकळी, कऱ्हे टाकळी, अमरापूर, दहिगावने, शहर टाकळी, दहिफळ आदि गावातही उत्साहात सामुहिक नमाज पठण झाले.