निमा संघटनेच्या आयुर्वेदिक शिबीराचा रुग्णांनी घेतला लाभ

 कोपरगाव  प्रतिनिधी दि. ११ : कोपरगाव येथील आयुर्वेदिक डाॅक्टर संघटनेच्या अर्थात निमा संघटनेच्यावतीने व डॉ. कौस्तुभ भोईर यांच्या वतीने मोफत आयुर्वेदिक उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले. यात विविध आजारांवर रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. 

जागतिक आरोग्य दिन व आयुर्वेदिक डॉक्टरांची निमा अर्थात नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (बी.ए.एम.एस) संघटनेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून शहरातील डॉ. कौस्तुभ भोईर यांच्या कल्पतरू आयुर्वेद चिकित्सालय यांच्या वतीने त्यांच्या रुग्णालयात  सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबीराचे उद्घाटन राष्ट्रीय आयुर्वेदिक गुरु  वैद्य डॉ. रामदास आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले.

या आयुर्वेदिक उपचार शिबीरात एकाच दिवशी ५७ रुग्णांवर आयुर्वेदिक व पंचकर्म उपचार करण्यात आले. अनेक जुनाट आजाराने ञस्त रुग्णांवर मोफत उपचार करुन रुग्णांना दिलासा दिला. हि अनोखी जनसेवा  कोपरगावच्या डॉक्टरांनी केले. त्यात डॉ.कौस्तुभ भोईर, डॉ.उमा भोईर, डॉ.जितेंद्र रणदिवे, डॉ.तुषार गलांडे,डॉ.मनोज बञा, डॉ. नितीन झंवर, डॉ.विलास आचारी, डॉ. अभिजित आचारी, डॉ. चंद्रशेखर आव्हाड, डॉ. वैभव गवळी, डॉ. सोनिया रणदिवे, डॉ. दिपाली आचारी, डॉ. विरेश भाकरे, डॉ. स्नेहल भाकरे, डॉ. अरुण भांडगे, डॉ. विजय कळमकर, डॉ.प्रितम कळवणकर यांनी उपचार करुन रुग्णांची सेवा केल्याने अनेक रुग्णांनी आयुर्वेदिक उपचार पध्दतीवर समाधान व्यक्त केले. 

अशा प्रकारे पुन्हा पुन्हा शिबिर घेवुन आरोग्य सेवा देण्याची विनंती करीत डॉक्टरांप्रती लाभ घेतलेल्या रुग्णांनी ऋण व्यक्त केले. यावेळी उपचार करणाऱ्या  डॉक्टरांनी उपस्थित रुग्णांना उपचारा बरोबर दैनंदिन जीवनशैली बद्दल आयुर्वेदिक सल्ला देवून  निरोगी जीवन जगण्याचा मंञ दिला.  कोपरगाव येथील निमा संघटनेने यापुर्वीही अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवून जनमाणसांची वैद्यकीय सेवा करीत  माणुसकी जपली आहे. निमा संघटनेचे कार्य समाजाला दिशादर्शक व निरोगी जीवन देणारे ठरत असल्याने अनेकांनी  समाधान व्यक्त केले.