राहाता प्रतिनिधी, दि. २७ : परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना तसेच संसद भवनात गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केलेले अवमानकारक वक्तव्य व सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा मृत्यू या घटनांच्या निषेधार्थ राहाता शहरात संविधान व डॉ आंबेडकर प्रेमी नागरिकांच्या वतीने मोर्चा काढून नगर मनमाड महामार्गावर ठिय्या आंदोलन करत दोषींवर कारवाई करण्यासह विविध मागण्यांच निवेदन प्रशासनाला देण्यात आले राहाता तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार हेमंत पाटील यांनी निवेदन स्वीकारले.
शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात संविधान व आंबेडकर प्रेमी नागरिक एकत्रित जमले या घटनांच्या निषेधार्थ बहुतांशी मोर्चेकर्यांनी काळा ड्रेस परिधान करून व काळ्याफिती लावून या घटनांचा निषेध नोंदविला. मोर्चाचे प्रारंभी स्वर्गीय पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर छत्रपती शिवाजी चौक ते पोलीस स्टेशन पर्यंतचे अंतरात पायी चालत मोर्चेकरांनी पोलीस स्टेशन समोर शिर्डी नगर महामार्गावर ठिय्या आंदोलन केले.
दरम्यान अमित शहा यांच्या निषेधार्थ जोरजोरात घोषणा दिल्या त्याचप्रमाणे यावेळी परभणी येथील घटनेचा व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येस जबाबदार असणाऱ्या पोलिसांचा सुद्धा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी आंबेडकरी चळवळीतील नेते बाळासाहेब गायकवाड, प्रदीप बनसोडे रिपाईचे सुरेंद्र थोरात, संदीप सोनवणे,संध्या थोरात सिमोन जगताप, गौतम पगारे , सचिन चौगुले, विशाल कोळगे, प्रभावती घोगरे, रशीद शेख आदींची भाषणे झाली या घटनांचा तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला.
उपस्थित संविधान प्रेमी व आंबेडकर प्रेमी जनतेने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जयघोष करत महसूल विभागाचे नायब तहसीलदार हेमंत पाटील यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. ठिय्या आंदोलनाच्या दरम्यान महामार्गावर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती. निवेदनानंतर आंबेडकर प्रेमी नागरिकांनी मोर्चा विसर्जित केला. या मोर्चा प्रसंगी प्रदीप बनसोडे, धनंजय निकाळे, राजेंद्र पाळंदे, गणेश निकाळे, उद्योजक मुन्नाभाई शहा, रमेश गायकवाड, हरदास गायकवाड, गंगाधर गमे, आसिफ खाटीक, पंकज लोंढे, मुन्ना खाटीक, ॲड.राज बनसोडे, विजयराव शिंदे, भागवतराव आरणे, वसंत खरात, रावसाहेब बनसोडे, अनिल गायकवाड, रावसाहेब निकाळे, सुधाकर बनसोडे, अमित वाघमारे, अरुण बनसोडे,
प्रदीप खरात दादासाहेब त्रिभुवन विलास पाळंदे संतोष गायकवाड, बापू गायकवाड, बंटी पगारे, जितु दिवे, करण कोळगे, दीपक शिंदे ,सुनील लोखंडे, स्वप्निल पारडे, नितीन धिवर, सचिन गायकवाड, नाना त्रिभुवन, अनिल त्रिभुवन, जॉन त्रिभोन, भाऊसाहेब जगताप, अजय जगताप, भावेश ब्राह्मणे, प्रकाश लोंढे, दत्तू गोडगे, गणेश बनसोडे, तुषार सदाफळ, किशोर दंडवते, प्रसाद पाटील, रावसाहेब बनसोडे, चाचा बनसोडे, मोगल बनसोडे, साई पाळंदे, अश्फाक शेख, ललित शेळके, सचिन कोळगे, सुरेश बनसोडे, मनोज बनसोडे, रवी बनसोडे, प्रवीण आल्हाट आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परभणी येथे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारका समोरील संविधानचे प्रतिकृती असलेल्या शिल्पाची झालेल्या विटंबनेच्या निषेधार्थ काढलेल्या निषेध मोर्चा प्रकरणी अटक केलेल्या परभणी येथील संविधान प्रेमी वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूस जबाबदार असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना कायमस्वरूपी निलंबित करावे, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवारातील व्यक्तीस शासकीय सेवेत समाविष्ट करावे व कुटुंबास शासकीय मदत मिळावी, परभणी येथील निषेध मोर्चातील नागरिकांवर झालेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे.
देशाचे केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी संसदेत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केलेल्या अवमानकारक वक्त्यव्या बद्दल त्यांनी देशातील नागरिकांची जाहीर माफी मागून केंद्रीय गृह मंत्री पदाचा राजीनामा द्यावा. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून अमानुषपणे मारहाण करून त्यांची निघृण हत्या करण्यात आली, त्यांचे हत्येतील आरोपीस तात्काळ अटक करून दोषीवर कठोर कार्यवाही व्हावी.महाराष्ट्रातील सर्व महापुरुषांच्या स्मारकात व परिसरात सी.सी.टी व्हि कॅमेरे बसवण्यात यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.