शेवगाव प्रतिनिधी, दि. २७ : युवकांनी मोबाईलवरचे गेम न खेळता क्रीडांगणावरील खेळ खेळले पाहिजेत. पैशाने शारीरिक क्षमता विकत घेता येणार नाही ती क्रीडांगणावर खेळ खेळूनच मिळते, असे मत एफडीएल शिक्षण संस्थेचे विश्वस्त पृथ्वीसिंह काकडे यांनी केले. चापडगाव माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते.
![](http://eloksanvad.com/wp-content/uploads/2021/08/renuka-maltistate-scaled.jpg)
अध्यक्षस्थानी खो खो पटू सचिन भाकरे होते. यावेळी प्राचार्य अरुण वावरे, पर्यवेक्षक लक्ष्मण गाडे, केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर जाधव, तुकाराम भगत ,पोपट सूर्यवंशी, अनारकली दळवी, किशोर तेलुरे, शहादेव शिरसाट, राजकुमार शहाणे , पद्माकर खरमाटे, आदी मान्यवर उपस्थित होते.
![](http://eloksanvad.com/wp-content/uploads/2020/10/sanjivani.png)
अध्यक्ष भाकरे यांनी खेळामध्ये विद्यार्थ्यांनी आदर्श निर्माण करावा. खेळात वर्चस्व मिळविले तर उच्च पदे सहज प्राप्त होतात, हा स्वतःचा अनुभव असल्याचे सांगितले. प्राचार्य वावरे म्हणाले, आहार, विहार व झोप या तिन्ही गोष्टीची सांगड जीवनामध्ये अतीमहत्त्वाची आहे. शारीरिक क्षमता खेळातून निर्माण होते तर आहारातून ऊर्जा निर्माण होते. खेळामध्ये नेतृत्व व सांघिक भावना निर्माण होते. प्रा. दादासाहेब ज्योतीक यांनी सुत्रसंचलन केले. आत्माराम झरेकर यांनी आभार मानले.
![](http://eloksanvad.com/wp-content/uploads/2020/10/sona-poly.png)