शेवगाव प्रतिनिधी, दि.१३ : गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना शेवगाव पोलीस ठाण्यात बोलावून, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तंबी दिली आहे.
गुरुवारी सकाळी, विविध गुन्ह्याशी संबंधित ६० ते ६५ जणांना पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले होते. त्यानंतर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे दाखल झाले. यावेळी त्यांनी आगामी सण, उत्सव, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता राखावी, नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, असं न झाल्यास जामीन रद्द होऊ शकतो असा सूचना उपस्थितनांना दिल्या.
त्यानंतर खैरे यांनी कऱ्हेटाकळी येथील चेक पोस्टची पाहणी केली. यावेळी पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे, सहायक पोलीस निरीक्षक कुमार माळी, अनिल बागुल, पोलीस सहायक निरीक्षक ए.जी. पवार, विशाल लहाने आदी उपस्थित होते.