मोबाईल रिटेल असोसिएशनच्या रक्तदान शिबिरात २१० रक्तदात्यांचे रक्तदान

शेवगाव प्रतिनिधी, दि. १२ : सध्या अनेक रक्तपेढ्या मध्ये रक्ताचा तुटवडा असल्यान सामाजिक दायित्व म्हणून शेवगाव मोबाईल रिटेल असोसिएशनच्या वतीने शुक्रवारी (दि१२ ) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. २१० रक्तदात्यांनी रक्तदानास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घुले पाटील मंगल कार्यालयात रक्तदान शिबीर घेतले गेले. यावेळी शेवगाव शहरातील सर्व मोबाईल व्यवसायिकांनी आपली  दुकाने बंद ठेवून शिबीरात उत्स्फूर्त सहभाग घेतला. सध्या राज्यामध्ये अनेक हॉस्पिटलमध्ये रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्या अनुषंगाने एक सामाजिक बांधिलकी म्हणून शेवगाव मोबाईल रिटेल असोसिएशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

नगरच्या लक्ष फाउंडेशन संचालित न्यू अर्पण व्हॅलेंटरी रक्त केंद्र रक्तपेढीचे डॉक्टरांच्या पथकांनी रक्त स्विकारले. ज्येष्ठ नेते अरुण पाटील लांडे डॉ.गणेश चेके डॉ.संजय लाड्डा उद्योजक विजयराव देशमुख अजिंक्य लांडे आदिनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

मोबाईल रिटेल असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन डाके, शेवगाव तालुका अध्यक्ष गौरव पितळे, विशाल पिसाळ, आदिनाथ खरात, शामल लोहिया, गणेश कबाडी, असलम पठाण, गोपाल खबाले, विशाल सबलोक, गणेश तोतरे, प्रीतम गर्जे, पप्पु विधाते, सचिन नाईकवाडी यांनी कार्यक्रम रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.