गुणवंतांचा सन्मान सर्वांसाठी प्रेरणादायी – डॉ . गाडेकर

शेवगाव प्रतिनिधी, दि . १ : कोणत्याही क्षेत्रात यशाश्वी झालेल्या गुणवंताचा सन्मान केल्यास, त्याच्या पाठीवर थाप टाकल्यास,  त्याच्यासाठी तसेच इतरासाठी देखील ती प्रेरणादायी ठरणार असते असे प्रतिपादन शिक्षण विस्तार अधिकारी डॉ . शंकर गाडेकर यांनी केले.

          येथील अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या शाखेत आयोजित केलेल्या कै .आचार्य दादासाहेब दोंदे व कै . भा . दा . पाटील गुरुजी पारितोषिक वितरण व सेवानिवृत्त शिक्षकांचा गुणगौरव समारंभ  कार्यक्रमात अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी बॅकेचे नेते बापूसाहेब तांबे यांनी बँकेच्या उपक्रमाची माहिती देऊन संचालक मंडळ अतिशय काटकसरीने कारभार करत असल्याचे सांगितले.

        आपल्या विनोदी शैलीत गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष राजकुमार साळवे यांनी प्राथमिक शिक्षकांच्या अशैक्षणिक कामांच्या समस्या सोडविण्या सदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी बँकेचे माजी चेअरमन राजू राहणे, माजी संचालक विनोद, विनोबा ॲप मध्ये पुरस्कार प्राप्त शिक्षिका मनीषा वडते, मुख्याध्यापक गोरक्षनाथ दातीर, विलास लवांडे, तात्यासाहेब बोडखे, ऐक्य मंडळाचे राजेंद्र निमसे आदींची भाषणे झाली.

        यावेळी कै .आचार्य दादासाहेब दोंदे पुरस्कार प्राप्त प्राजक्ता पिसे, साक्षी बोडखे, क्षितिजा फलके, अमोल गायकवाड, आदित्य मुटकुळे, ओमप्रकाश मुटकुळे, सारंग लबडे, वैष्णवी आरे व कै. भादा पाटील गुरुजी पुरस्कार प्राप्त राहुल पालवे, विनोबा ॲप मधील अवार्ड प्राप्त  मनीषा वडते, रीनाज पठाण, सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

        यावेळी बँकेचे चेअरमन डॉ. संदीप मोरे, व्हा. चेअरमन कैलास सारोक्के यांच्यासह संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप मुरदारे उपस्थित होते.  बँकेचे संचालक रमेश गोरे यांनी प्रास्ताविक केले. नाना शिंदे व गोरक्षनाथ दुसंगे यांनी सूत्रसंचालन केले. निवृत्ती गोरे यांनी आभार मानले.