भाकरी फिरवण्याचा सर्वसामान्य मतदारांचाच निर्णय – राणी लंके

शेवगाव प्रतिनिधी, दि.१३ : दिवस बदलले आहेत. वातावरण महाविकास आघाडीला अत्यंत अनुकूल आहे. कार्यकर्त्यानी कोणाचेही दडपण न ठेवता कामाला लागावे. यावेळी सर्व सामान्य मतदारांनी भाकरी फिरवायचा निर्णय घेतला आहे. त्यास साथ द्या आणि येथील विजयाचे हिस्सेदार बना असे आवाहन माजी जि प सदस्या राणी लंके यांनी येथे केले.

महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पत्नी धनश्री विखे यांच्या पाठोपाठ महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे उमेदवार आमदार निलेश लंके यांच्या पत्नी माजी जिप सदस्या राणी लंके यांनीही शेवगावात शुक्रवारी धावता दौरा करून कार्यकर्त्याच्या बैठका घेऊन त्यांचेसी सुसंवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महसूल मत्री बाळासाहेब थोरात यांचे प्रतिनिधी, धनंजय डहाळे, माजी जि प सदस्य प्रकाश भोसले, प्रकाश तिजोरे, राष्ट्रवादी शरदशचंद्र पवार गट सेवा दलाचे जिल्हा उपाध्यक्ष राहूल वरे, समीर काझी, सलीम काझी, सुधीर बाबर, कचरू मगर, आरिफ जहागीरदार, यांचेसह युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.